शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी :  नेत्रावतीमध्ये ब्राऊन शुगरसदृश पावडर, यंत्रणेकडून कसून तपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2018 11:35 IST

कोकण रेल्वेमार्गावरून धावणाऱ्या व गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या नेत्रावती एक्सप्रेसमध्ये ब्राऊन शुगर हा मादक पदार्थ नेला जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर रेल्वे पोलीस व बेलापूर नियंत्रण कक्षाने तपासाची चक्रे जोरात फिरवली.

ठळक मुद्देनेत्रावतीमध्ये ब्राऊन शुगरसदृश पावडर यंत्रणेकडून कसून तपास

रत्नागिरी : कोकण रेल्वेमार्गावरून धावणाऱ्या व गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या नेत्रावती एक्सप्रेसमध्ये ब्राऊन शुगर हा मादक पदार्थ नेला जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर रेल्वे पोलीस व बेलापूर नियंत्रण कक्षाने तपासाची चक्रे जोरात फिरवली.

चिपळुण स्थानकात या गाडीची बुधवारी सायंकाळी कसून तपासणी करण्यात आली. त्यावेळी गाडीच्या एका बोगीत एक सुटकेस बेवारस आढळून आली. त्यामध्ये ब्राऊन शुगरसदृश पावडर असलेले एक पाकीट आढळले असून रेल्वे पोलीस व चिपळुण पोलीस याची कसून तपासणी करीत आहेत.दक्षिणेकडे जाणाऱ्या नेत्रावती एक्सप्रेसमधून ब्राऊन शुगर वाहून नेत असल्याची गुप्त माहिती त्रिवेंद्रम सुरक्षा कक्षाने दिली होती. त्यानंतर रेल्वे सुरक्षा दल व बेलापूर नियंत्रण कक्षाने तपासाची चक्रे वेगात फिरवली.

नेत्रावती एक्सप्रेस चिपळुण रेल्वे स्थानकात आली असता आधीपासूनच सज्ज असलेल्या रेल्वे पोलीस व पोलिसांनी गाडीची कसून तपासणी केली. त्यामध्ये एक सुटकेस बेवारस स्थितीत आढळून आली. त्यामध्ये ही ब्राऊन शुगर सदृश पावडर आढळून आली. मात्र ही ब्राऊन शुगरच आहे की अन्य काही याबाबत खातरजमा करणे बाकी आहे.

नेत्रावती गाडीची रत्नागिरी स्थानकातही पुन्हा तपासणी करण्यात आली. पोलीस तपासाच्या हालचालींमुळे संशयित पसार झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र एका संशयिताला ताब्यात घेतल्याचीही चर्चा आहे.याप्रकरणाची कसून चौकशी होत असल्याचे रेल्वेच्या सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :Konkan Railwayकोकण रेल्वेRatnagiriरत्नागिरी