शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी : सप्तलिंगी नदीवरील पुलाचा खांब ढासळला, वाहतूक बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2018 16:42 IST

कोसुंब- तुळसणी मार्गावरील सांगवे येथे सप्तलिंगी नदीवरील पुलाचा खांब ढासळला आहे. हा पूल कोणत्याही क्षणी कोसळेल, अशी स्थिती निर्माण झाली आहे. खबरदारी म्हणून या पुलावरून होणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे.

ठळक मुद्देसप्तलिंगी नदीवरील पुलाचा खांब ढासळला, वाहतूक बंदशेकडो विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांवर पायपीटची वेळ

देवरूख : कोसुंब- तुळसणी मार्गावरील सांगवे येथे सप्तलिंगी नदीवरील पुलाचा खांब ढासळला आहे. हा पूल कोणत्याही क्षणी कोसळेल, अशी स्थिती निर्माण झाली आहे. खबरदारी म्हणून या पुलावरून होणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे. वाहतूक बंद असल्यामुळे सांगवे, तुळसणी, फणसट गावातील शेकडो विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांना पायपीट करावी लागत आहे. याची दखल घेत बांधकाम विभागाने पुलाची डागडुजी तातडीने करावी, अशा मागणीचे निवेदन ग्रामपंचायतीतर्फे देण्यात आले आहे.संगमेश्वर तालुक्यातील सांगवे, तुळसणी, फणसट हा ग्रामीण भाग आहे. या तीन गावांचा तालुक्याशी संपर्क राहावा, वाहतुकीसाठी सोयीचा मार्ग व्हावा, यासाठी सांगवे येथील सप्तलिंगी नदीवर पूल होणे गरजेचे होते. येथीलच सामाजिक कार्यकर्ते मेजर सीताराम लक्ष्मण शेलार यांच्या पाठपुराव्याने या ठिकाणी पूल मंजूर झाला होता.

पुलाचे बांधकाम होऊन अनेक वर्षांचा कालावधी लोटला आहे. या मार्गावरून सध्या वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असल्याने हा पूल धोकादायक बनला होता. गतवर्षी पावसाळ्यात पुलाच्या डाव्या बाजूचा भराव वाहून गेल्याने त्यावेळी एकच खळबळ उडाली होती. परिणामी काही दिवस वाहतूक बंद ठेवण्यात आल्याने ग्रामस्थांची गैरसोय झाली होती.या पुलाच्या डागडुजीसाठी पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी १० लाख रूपये मंजूर केले होते. या निधीतून पुलाची तात्पुरत्या स्वरूपात डागडुजी करण्यात आली आहे. मात्र, संपूर्ण पुलाची डागडुजी करणे अथवा पूल नव्याने बांधणे गरजेचे आहे. यासाठी ग्रामस्थांनी संबंधीत विभागाकडे वारंवार पत्रव्यवहाराबरोबरच पाठपुरावा केला. मात्र, बांधकाम विभागाने या मागणीकडे दुर्लक्ष केल्याची ओरड ग्रामस्थांमधून होत आहे.याचाच फटका पुन्हा सोमवारपासून सांगवेवासियांना बसत आहे. पुलाचा पिलर खालील बाजूने ढासळला आहे. ही बाब काही ग्रामस्थांच्या निदर्शनास आली आणि एकच खळबळ उडाली. या मार्गावरून अवजड वाहनांचीही ये- जा सुरू असते. कोणताही अनर्थ घडू नये, याकरिता खबरदारी म्हणून पुलावरून होणारी वाहतूक सोमवारपासूनच बंद ठेवण्यात आली आहे.या परिसरातील विद्यार्थी शालेय, महाविद्यालयीन शिक्षणासाठी देवरूख येथे येतात. मात्र बसफेऱ्या या सांगवे मुस्लीम मोहल्ल्यापर्यंत सुरू आहेत. परिणामी सांगवेसह तुळसणी, फणसट येथील विद्यार्थी, ग्रामस्थांना ७ किलोमीटरची पायपीट करावी लागत आहे. त्यामुळे याबाबत त्वरित निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात येत आहे.लोकप्रतिनिधींचे दुर्लक्षग्रामस्थांनी मंगळवारी पुन्हा जिल्हाधिकारी व बांधकाम विभागाला पुलाच्या बांधकामाबाबत पत्र दिले आहे. हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्याने या ठिकाणाहून वाहन जात नाही. त्यामुळे ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांना पायपीट करावी लागत असल्याचे ग्रामस्थांनी म्हटले आहे. या पुलाचे काम ढासळत असताना लोकप्रतिनिधींनी मात्र याकडे दुर्लक्ष केल्याची खंत ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. 

टॅग्स :pwdसार्वजनिक बांधकाम विभागRatnagiriरत्नागिरी