शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी : मूर्तवडे-वारेली ग्रुप ग्रामपंचायत विभाजनासाठी भास्कर जाधव यांचा विधानसभेत औचित्याचा मुद्दा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2017 16:38 IST

गुहागर विधानसभा मतदारसंघातील चिपळूण तालुक्यातील मूर्तवडे-वारेली ग्रुप ग्रामपंचायतीचे विभाजन करून वारेली गावासाठी स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन करण्यात यावी, अशी मागणी भास्कर जाधव यांनी आज विधानसभेत औचित्याचा मुद्याद्वारे शासनाकडे केली.

ठळक मुद्देवारेली गावासाठी स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन करण्यात यावीवारेली गाव अत्यंत डोंगराळ भागात मूर्तवडे ग्रुप ग्रामपंचायत कार्यालयात जाण्यासाठी वारेली ग्रामस्थांना 19 किलोमीटरचा प्रवास

रत्नागिरी :  गुहागर विधानसभा मतदारसंघातील चिपळूण तालुक्यातील मूर्तवडे-वारेली ग्रुप ग्रामपंचायतीचे विभाजन करून वारेली गावासाठी स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन करण्यात यावी, अशी मागणी भास्कर जाधव यांनी आज विधानसभेत औचित्याचा मुद्याद्वारे शासनाकडे केली.नागपूर अधिवेशनाच्या आज पाचव्या दिवशी औचित्याचे मुद्दे मांडण्याच्या काळात जाधव यांनी आपल्या गुहागर विधानसभा मतदारसंघातील हा विषय मांडून त्यास वाचा फोडली. हा मुद्दा सादर करताना ते म्हणाले की, "वारेली हे गाव अत्यंत डोंगराळ भागात वसलेले असून तेथील ग्रामस्थांना ग्रामपंचायतीशी संबंधित कामांसाठी मूर्तवडे या गावात असलेल्या ग्रुप ग्रामपंचायत कार्यालयात जाण्यासाठी 19 किलोमीटरचा प्रवास करावा लागतो.

पायवाटेने जावे लागल्यास मोठा डोंगर चढ-उतार करून ये-जा करावी लागते. यामुळे ग्रामस्थांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो आणि पायपीट करावी लागल्याने खूप हाल होतात. ही समस्या लक्षात घेता आणि सद्यस्थितीतील लोकसंख्येचा विचार करता या ग्रुप ग्रामपंचायतीचे विभाजन करून वारेली येथे स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन करण्यात यावी."या ग्रुप ग्रामपंचायतीचे विभाजन करून वारेलीसाठी स्वतंत्र ग्रामपंचायत निर्माण करण्यात यावी, अशी मागणी जाधव यांनी यापूर्वी अनेकदा ग्रामविकास मंत्री यांच्याकडे पत्राद्वारे केली होती. परंतु, त्याची दखल न घेतल्याने आज त्यांनी विधानसभेत औचित्याचा मुद्याद्वारे आवाज उठवला. त्यामुळे आता या प्रक्रियेला चालना मिळून वारेलीसाठी स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

 

टॅग्स :Bhaskar Jadhavभास्कर जाधवNagpur Winter Session-2017नागपूर हिवाळी अधिवेशन-२०१७