शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी : त्या बॅगेत आढळून आले धातूचे पान, श्वान पथक, एटीएस पथकाला केले पाचारण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2018 12:34 IST

कोकण रेल्वे मार्गावरुन गोव्याकडे जाणाऱ्या नेत्रावती एक्स्प्रेसमध्ये आढळलेल्या निळ्या रंगाच्या बॅगेत धातूचे पान असल्याचे आढळून आले आहे.

ठळक मुद्देत्या बॅगेत आढळून आले धातूचे पान, श्वान पथक, एटीएस पथकाला केले पाचारण रेल्वे स्टेशन आवारात भितीचे वातावरण

चिपळूण : कोकण रेल्वे मार्गावरुन गोव्याकडे जाणाऱ्या नेत्रावती एक्स्प्रेसमध्ये आढळलेल्या निळ्या रंगाच्या बॅगेत धातूचे पान असल्याचे आढळून आले आहे.कुर्ला टर्मिनस (मुंबई) येथून सकाळी ११.४० वाजता सुटणाऱ्यां नेत्रावती एक्स्प्रेसमध्ये एक अनोळखी बॅग असल्याची माहिती आरपीएफच्या जवानांना देण्यात आली. चिपळूण रेल्वे स्थानकावर सायंकाळी ६.३० वाजता गाडी थांबल्यानंतर आरपीएफच्या जवानांनी ती बॅग ताब्यात घेतली.

सुरुवातीला या बॅगेत बॉम्ब असल्याची अफवा पसरवण्यात आली. त्यामुळे रेल्वेतील प्रवाशी व चिपळूण स्थानकावर असलेल्या प्रवाशांमध्ये खळबळ उडाली होती. बॅगेत संशयास्पद वस्तू असल्याची शक्यता आहे असे रेल्वे पोलिसांकडून सांगण्यात आले. त्यानंतर प्रवाशी शांत झाले.या दरम्यान रेल्वेमध्ये ही बॅग नक्की कोणी ठेवली याचा शोध सुरु झाला. त्यासाठी ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी ते गोवापर्यंत नाकाबंदी करण्यात आली. नेत्रावती एक्सप्रेसमधून वालोपे रेल्वे स्टेशन आवारात ही बॅग ठेवली. त्या ठिकाणी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.शितल जानवे, पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ व इतर कर्मचाऱ्यांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.सकाळी १० नंतर रत्नागिरी बॉम्ब शोध व नाश पथक, एटीएस (दहशतवादी विरोधी पथक), श्वान पथक, घरडा केमिकल संशोधन केंद्राचे पथक दाखल झाले. या निळ्या बॅगमध्ये नेमकी कोणती संशयास्पद वस्तू आहे याचा शोध घेण्यास सुरुवात झाली.

सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत विविध पथकांद्वारे तपास सुरु होता. मात्र या बॅगमध्ये सिल्व्हर कोटिन असलेल्या काचेच्या पेटीत अँटी पिस (धातूचे पान) आढळून आले. अधिक तपास चिपळूण पोलीस करीत आहेत.

टॅग्स :Bombsस्फोटकेRatnagiriरत्नागिरी