शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी : गणपतीपुळे होणार सेफ्टी झोन, मेरिटाईम बोर्डचा प्रयत्न, पर्यटकांच्या संरक्षणासाठी अ‍ॅक्वाटिककडून पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2018 16:58 IST

प्रसिद्ध तीर्थक्षेत्र गणपतीपुळे येथे येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होत आहे. गणपतीपुळे येथे येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी मेरिटाईम बोर्डाने पाऊल उचलले आहे. गणपतीपुळे समुद्रकिनारा सेफ्टी झोन करण्यासाठी पुण्याच्या महाराष्ट्र स्टेट क्वाटिक म्युचर असोसिएशनचे सहकार्य घेतले आहे. जानेवारी महिन्याच्या अखेरीस अ‍ॅक्वाटिकची टीम गणपतीपुळेची पाहणी करणार आहे.

ठळक मुद्देगणपतीपुळे होणार सेफ्टी झोनपर्यटकांच्या संरक्षणासाठी अ‍ॅक्वाटिककडून पाहणी पाहणी जानेवारी महिन्याच्या अखेरीस, मेरिटाईम बोर्डचा प्रयत्नचिवला (सिंधुदुर्ग) बीच येथे होणार प्रयोग

रत्नागिरी : प्रसिद्ध तीर्थक्षेत्र गणपतीपुळे येथे येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होत आहे. गणपतीपुळे येथे येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी मेरिटाईम बोर्डाने पाऊल उचलले आहे.

गणपतीपुळे समुद्रकिनारा सेफ्टी झोन करण्यासाठी पुण्याच्या महाराष्ट्र स्टेट क्वाटिक म्युचर असोसिएशनचे सहकार्य घेतले आहे. जानेवारी महिन्याच्या अखेरीस अ‍ॅक्वाटिकची टीम गणपतीपुळेची पाहणी करणार आहे.कोकणात येणाऱ्या पर्यटकांना येथील समुद्रकिनाऱ्यांनी भुरळ घातली आहे. त्यामुळे याठिकाणी येणारा पर्यटक समुद्रकिनाऱ्याचा आनंद घेण्यासाठी त्याचठिकाणी राहण्याचे पसंत करतो. रत्नागिरीतील गणपतीपुळे येथे येणाऱ्या पर्यटकांची संख्या अधिक आहे. तर समुद्रात बुडून मृत्यूमुखी पडणाऱ्या घटनादेखील घडत आहेत.त्यामुळे हा समुद्रकिनारा पर्यटकांसाठी धोकादायक ठरला आहे.

डिसेंबरअखेरीस पर्यटनासाठी मुंबई, पुण्यासह परजिल्ह्यातील पर्यटकांनी गणपतीपुळे, गुहागर, दापोलीतील किनाऱ्यांना पसंती दिली होती. गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत यावर्षी विक्रमी गर्दी झाली होती. गणपतीपुळेचा किनारा पोहणाऱ्यांसाठी धोकादायक बनला असून, तेथे सुरक्षित उपाययोजना करणे आवश्यक आहे.गेली दोन वर्षे जिल्हा प्रशासनाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. किनाऱ्यावर जीवरक्षकही नेमण्यात आले, परंतु पर्यटकांची संख्या अधिक आणि जीवरक्षक मोजकेच अशी स्थिती आहे. पर्यटकांचा ओघ लक्षात घेऊन गणपतीपुळे सेफ्टी झोन निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे.

चिवला (सिंधुदुर्ग) बीच येथे हा प्रयोग केला जात आहे. त्यासाठी पुण्याच्या महाराष्ट्र स्टेट अ‍ॅक्वाटिक अ‍ॅम्युचर असोसिएशनची मदत घेण्यात आली आहे. त्या बीचवर धोकादायक झोन तयार करून तेथे पोहण्यास प्रतिबंध करण्यात येणार आहे.गणपतीपुळेचा भाग दोन डोंगरांमध्ये असल्याने भरती-ओहोटीच्या विशिष्ट वेळी तेथे चाळ निर्माण होते. त्यात पोहणारा पर्यटक अडकला तर तो बुडतो. याच बाबींचा अभ्यास करून तेथे पोहण्यास प्रतिबंध झोन तयार केले जाणार आहेत. तांत्रिकदृष्ट्या हे काम करणाऱ्या संस्था आपल्याकडे कमी आहेत. एप्रिल, मे महिन्यातील पर्यटन हंगामात पर्यटक वाढले, तर त्यांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना करण्यात येतील.

टॅग्स :Ganpatipule Mandirगणपतीपुळे मंदिरRatnagiriरत्नागिरी