शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी : भाजपशी असलेली युती क्षणिक : जगदीश गायकवाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2018 16:47 IST

संविधानाच्या मूळ ढाचाला कोणीही हात लावू शकत नाही. तसा प्रयत्न करणाऱ्यांचा रिपब्लिकन कार्यकर्ता पाणउतारा केल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा रिपाइंचे कोकण प्रदेश अध्यक्ष जगदीश गायकवाड यांनी दिला.

ठळक मुद्देभाजपशी असलेली युती क्षणिक : जगदीश गायकवाड मंडणगडमध्ये रिपाइंतर्फे कार्यकर्ता मेळावा

मंडणगड : भारतीय जनता पार्टीशी असलेली युती राजकीय अजेंड्यानुसार व क्षणिक आहे, हे खुलेपणाने मान्य करून रिपब्लिकन पक्ष दलित समाजाच्या विकासाचे काम करत आहे. फोडाफोडीचे राजकारण कोण करतो, हे जगजाहीर आहे. आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांचीही देखरेख असल्याने संविधान सुरक्षित आहे.

संविधानाच्या मूळ ढाचाला कोणीही हात लावू शकत नाही. तसा प्रयत्न करणाऱ्यांचा रिपब्लिकन कार्यकर्ता पाणउतारा केल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा रिपाइंचे कोकण प्रदेश अध्यक्ष जगदीश गायकवाड यांनी दिला.रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, आठवले गट, तालुका शाखा, मंडणगडच्यावतीने शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकात कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

ते म्हणाले की, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले बाबासाहेबांचा पक्ष त्यांच्या विचाराने पुढे नेत आहेत. याउलट त्यांचे वारस त्यांच्या विचारांचे विपरीत वर्तन करीत आहेत. त्यांनी नको ते राजकारण करण्यापेक्षा समाजाचे नेतृत्व मान्य करुन रिपब्लिकन एकतेच्या आवाहनाला प्रतिसाद द्यावा, असे आवाहनही यावेळी केले.निवडणुकांवर भाष्य करताना ते पुढे म्हणाले की, आगामी काळात आमदार होऊ इच्छिणाऱ्यांना रिपाइंच्या कार्यकर्त्यांचा सन्मान करावाच लागेल. हेच कार्यकर्ते आपल्या ताकदीच्या आधारे आमदार कोण होणार, हे ठरवणार असल्याने मते विकण्यापेक्षा आधी आपल्या समस्या सोडवा व शासकीय योजनांचा जास्तीत जास्त लाभ घ्या, कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान तालुका अध्यक्ष राजेश गमरे यांनी भूषविले.

टॅग्स :PoliticsराजकारणRatnagiriरत्नागिरी