शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rains: पुण्यात पावसाचा हैदोस! अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली, घरात शिरले पाणी
2
मुंबईसह उपनगराला पावसाने झोडपले! गोरेगाव, मालाडमध्ये तुफान पाऊस, अंधेरी भुयारी मार्ग बंद
3
Kalyan Building Collapses: कल्याण दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा
4
पाकिस्तानने असीम मुनीरचे केले प्रमोशन, लष्करात फील्ड मार्शल रँक किती महत्त्वाची?
5
RR vs CSK : धोनीसमोर संजू ठरला भारी! विजयासह राजस्थाननं शेवट केला गोड
6
IPL 2025 : १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीची 'परिपक्व' खेळी; सिक्सर मारत साजरी केली फिफ्टी!
7
'मीर जाफर vs एक बिर्याणी देशावर भारी'; भाजप-काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर! का वाढला वाद?
8
आयुष म्हात्रेनं २०० च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा; माफाकानं बेस्ट कॅचसह साधला विकेटचा डाव
9
सातारा: जेवणाचा डब्बाच डोक्यात मारला, प्रेमसंबंधास अडथळा ठरत असल्याने तरुणाचा खून
10
परीक्षेच्या शेवटच्या दिवशी विद्यार्थिनीने केली आत्महत्या; लातूरच्या शासकीय महिला तंत्रनिकेतनच्या वसतिगृहात घेतला गळफास
11
क्षुल्लक मुद्द्याला जास्त महत्व देऊ नका, हे प्रकरण इथेच थांबवा; सरन्यायाधीश गवई यांचे आवाहन
12
पाकिस्तानची पोलखोल करण्यासाठी भारताचे शिष्टमंडळ तयार; कोण कुठे जाणार? पाहा...
13
Viral Video: आधी देवाला हात जोडले, नंतर मंदिरातील दानपेटी नेली चोरून
14
पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीरचे प्रमोशन; पराभूत जनरलला सरकारने बनवले 'फील्ड मार्शल'
15
छगन भुजबळांच्या मंत्रिमंडळात एन्ट्रीने नाशिकचा दबदबा, पण पालकमंत्रिपदाचा पेचही वाढला?
16
IPL 2025: आता पाऊस पडल्यानंतरही सामने रद्द होणार नाहीत, आयपीएलमध्ये नवा नियम लागू!
17
"पती नेत्यांना पुरवतो २० वर्षांच्या मुली, मला…’’, महिलेच्या आरोपांनी या राज्यातील राजकारण तापले   
18
Thane: कल्याणमध्ये चार मजली इमारतीत स्लॅब कोसळून भयंकर दुर्घटना, चार जणांचा मृत्यू 
19
ठरलं ! जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमवर रंगणार IPL फायनल; या मैदानात होणार प्लेऑफ्सचे २ सामने
20
पाकिस्तानने आपल्याच नागरिकांवर केला ड्रोन हल्ला, चार मुलांचा मृत्यू

रत्नागिरी : ९१ कामगारांची सेवामुक्ती, नियमबाह्य कारवाई : एसटी कामगार संघटनेतर्फे आंदोलनाचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2018 14:47 IST

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलनात सहभाग घेतल्याचा ठपका ठेवून नवीन कामगारांना सेवामुक्त करण्याचा आदेश मध्यवर्ती कार्यालयाने दिला आहे.

ठळक मुद्दे९१ कामगारांची सेवामुक्ती, नियमबाह्य कारवाई एसटी कामगार संघटनेतर्फे आंदोलनाचा इशारा

रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलनात सहभाग घेतल्याचा ठपका ठेवून नवीन कामगारांना सेवामुक्त करण्याचा आदेश मध्यवर्ती कार्यालयाने दिला आहे.

महामंडळाची शिस्त व अपील कार्यपध्दतीचा अवलंब न करता प्रशासन परस्पर कारवाई करत असून, ती नियमाबाह्य आहे. प्रशासनाने आपल्या निर्णयात बदल न केल्यास एस. टी. कामगार संघटनेला पुन्हा आंदोलनाला छेडावे लागेल, असा इशारा महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे जनरल सेके्रटरी हनुमंत ताटे यांनी दिला आहे.राज्यभारात एस. टी.च्या कर्मचाऱ्यांनी ८ व ९ रोजी दोन दिवस कामबंद आंदोलन केले होते. नवीन कामगारही यात सहभागी झाले होते. पहिल्या दिवशी ८३ लोकांवर कारवाई करण्यात आली होती. दुसऱ्या दिवशी ८ जणांवर कारवाई केल्याने एकूण ९१ लोकांचा त्यामध्ये समावेश होता. या कर्मचाऱ्यांना आता सेवामुक्त करण्यात येणार आहे.

राज्यभरातील ११०० लोकांवर कारवाई करण्यात आली होती. आंदोलनादरम्यान परिवहन मंत्र्यांसमवेत झालेल्या बैठकीत कामगारांवर कारवाई न करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. प्रसारमाध्यमांच्या उपस्थितीत मंत्र्यांनी आश्वासन देऊनही प्रशासन त्याची पायमल्ली करीत आहे.मध्यवर्ती कार्यालयाने सर्व विभागीय कार्यालयांना बंदमध्ये सहभागी असलेल्या नवीन कामगारांना सेवामुक्त करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यामध्ये अनुकंपातत्त्वावर लागलेल्या कामगारांचाही समावेश आहे.

या आदेशामुळे महाराष्ट्र एस. टी. कामगार संघटनेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. एस. टी. प्रशासन नियमांची पायमल्ली करत आहे. प्रशासनाच्या या भूमिकेमुळे कामगारांमध्ये असंतोष पसरला आहे. प्रशासन भूमिकेवर ठाम राहिले तर संघटना आंदोलन करेल, असा इशारा कामगार संघटनेचे सहसचिव हनुमंत ताटे यांनी दिला आहे.

टॅग्स :ST Strikeएसटी संपstate transportराज्य परीवहन महामंडळRatnagiriरत्नागिरी