शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी :परिवहन कार्यालयाच्या विस्तारासाठी तीन कोटी, जागेची गैरसोय दूर होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2018 15:27 IST

जिल्ह्यातील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाची जागा अपुरी पडत असल्याने इमारतीचे विस्तारीकरण करण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव देण्यात आला होता. या प्रस्तावाला शासन स्तरावरून नुकतीच मान्यता मिळाली आहे.

ठळक मुद्देपरिवहन कार्यालयाच्या विस्तारासाठी तीन कोटी, जागेची गैरसोय दूर होणार : अधिकाऱ्यांच्या प्रयत्नांना यश

सागर पाटील

टेंभ्ये : जिल्ह्यातील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाची जागा अपुरी पडत असल्याने इमारतीचे विस्तारीकरण करण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव देण्यात आला होता. या प्रस्तावाला शासन स्तरावरून नुकतीच मान्यता मिळाली असून, इमारतीच्या विस्तारीकरणासाठी ३ कोटी ८१ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण यांनी हा प्रस्ताव मंजूर होण्यासाठी विशेष प्रयत्न केले होते. यामुळे आगामी काळात उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाची दुमजली इमारत पाहायला मिळणार आहे.

अपुऱ्या जागेमुळे सध्या लोकांना बसण्यास जागा कमी पडत आहे. अनेकवेळा लोकांना कार्यालयाच्या परिसरात जागा मिळेल तेथे थांबावे लागत आहे. इमारतीच्या विस्तारीकरणानंतर या समस्या दूर होतील, असा विश्वास विनोद चव्हाण यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केला.रत्नागिरी येथे असणाऱ्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाची इमारत, या कार्यालयात येणाऱ्या लोकांचा विचार करता अपुरी पडत आहे. यामुळे अनेकवेळा या कार्यालयाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळते.

या कार्यालयातील कर्मचाऱ्यांनादेखील अत्यंत कमी जागेत आपल्या विभागाचे काम करावे लागत आहे. यावर उपाय म्हणून इमारतीचा दुसरा मजला बांधण्यास परवानगी मिळावी, असा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे देण्यात आला होता.राज्यातील बहुतांश उपप्रादेशिक परिवहन कार्यालये दुमजली आहेत. या प्रस्तावाला शासनस्तरावरून नुकतीच मान्यता मिळाली आहे. त्यानुसार ३ कोटी ८१ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत.इमारतीच्या विस्तारीकरणाचे काम लवकरच सुरु होणार असल्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण यांनी सांगितले. उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या इमारतीचा आदर्श नमुना ठरलेला आहे. त्यानुसारच कार्यालयाच्या विस्तारीत इमारतीचे बांधकाम केले जाणार आहे.ब्रेकटेस्ट ट्रॅकसाठी ३२ लाख रुपये मंजूर!रत्नागिरी जिल्ह्यासाठी दुसरा ब्रेक टेस्ट टॅक चिपळूण याठिकाणी मंजूर झाला आहे. या टेस्ट ट्रॅकच्या बांधकामासाठी ३२ लाख ५५ हजार २८१ रुपयांचा निधी शासन स्तरावरून नुकताच मंजूर झाला आहे.

शासनस्तरावरून हा निधी नुकताच उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आला आहे. सध्या हातखंबा, रत्नागिरी येथे असणारा ट्रॅक उत्तर रत्नागिरीमधील लोकांना अंतराच्या दृष्टीने त्रासदायक होत असल्याने चिपळूण तालुक्यातील पिंपळी बु. येथे जिल्ह्यातील दुसरा ट्रॅक उभारण्यात येणार आहे.

दुसरा ट्रॅक असणारा रत्नागिरी हा राज्यातील एकमेव जिल्हा ठरला आहे. निधी उपलब्ध झाला असल्याने ट्रॅकचे काम तत्काळ पूर्ण केले जाणार असल्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी चव्हाण यांनी सांगितले.

टॅग्स :state transportराज्य परीवहन महामंडळRatnagiriरत्नागिरी