शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी : सामुदायिक सोहळ्यात शेतकरी कुटुंबातील ११ मुलींचे विवाह होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2018 14:00 IST

धर्मादाय आयुक्त कार्यालयाच्या पुढाकाराने व सहाय्यक धर्मादाय आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आलेल्या सामुदायिक विवाह सोहळा समितीतर्फे येत्या १२ मे रोजी सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला आहे. येथील पटवर्धन प्रशालेच्या आवारात दुपारी १२.३५ मिनिटांनी हा सोहळा होणार आहे. यावेळी कष्टकरी, शेतकरी कुटुंबातील ११ मुलींचे विवाह यावेळी होणार आहेत.

ठळक मुद्दे धर्मादाय आयुक्त कार्यालयाच्या पुढाकार पटवर्धन प्रशालेच्या आवारात सामुदायिक विवाह सोहळा समितीतर्फे आयोजन मणी मंगळसूत्र, संसारोपयोगी भांडी, पोशाख, भोजन व्यवस्था

रत्नागिरी : धर्मादाय आयुक्त कार्यालयाच्या पुढाकाराने व सहाय्यक धर्मादाय आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आलेल्या सामुदायिक विवाह सोहळा समितीतर्फे येत्या १२ मे रोजी सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला आहे. येथील पटवर्धन प्रशालेच्या आवारात दुपारी १२.३५ मिनिटांनी हा सोहळा होणार आहे. यावेळी कष्टकरी, शेतकरी कुटुंबातील ११ मुलींचे विवाह यावेळी होणार आहेत.धर्मादाय आयुक्त कार्यालयांतर्गत नोंदणीकृत असणाऱ्या धार्मिक व धर्मादाय स्वरूपाच्या न्यासाकडे शिल्लक निधीतील काही निधीचा वापर समाजकल्याण, सामजिक उपक्रमाकरिता करता येतो. त्यातूनच सर्व धर्मियांसाठी ही योजना राबविण्यात येणार आहे. यासाठी जिल्ह्यातील विविध सामाजिक संस्थांच्या २५ प्रतिनिधींची नोंदणीकृत सामुदायिक विवाह सोहळा समिती तयार झाली आहे.

या सामुदायिक विवाहाची जबाबदारी धर्मादाय आयुक्त शिवकुमार डिगे आणि सहाय्यक धर्मादाय आयुक्त ए. पी. कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सामुदायिक विवाह सोहळा समिती उचलणार आहे. यासाठी आवश्यक असणारे मणी मंगळसूत्र, संसारोपयोगी भांडी, पोशाख, भोजन व्यवस्था विविध संस्था तसेच व्यक्ती करणार आहेत. वधू - वरांना घरापासून विवाहस्थळापर्यंत आणण्यासाठीचा प्रवास खर्च समिती उचलणार आहे.सामाजाची गरज म्हणून असे सामुदायिक विवाह होणे गरजेचे असल्याने धर्मादाय आयुक्त कार्यालयाने उत्तम पाऊल उचलले आहे. या सोहळ्याला धर्मादाय कार्यालयाच्या सहआयुक्त निवेदिता पवार तसेच इतर शासकीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत. या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन सहाय्यक धर्मादाय आयुक्त अमोल कुलकर्णी तसेच सामुदायिक विवाह समितीतर्फे करण्यात आले आहे.वारेमाप खर्च...लग्नसोहळा सध्याच्या काळात प्रतिष्ठेचा समजला जात असल्याने वधू आणि परपक्षांकडून या सोहळ्यासाठी वारेमाप खर्च केला जातो. मुलीच्या वडिलांची ऐपत नसल्याने प्रसंगी घर, जमीन गहाण ठेवून मुलीचे लग्न करून देतात. या घटना थांबाव्यात, यासाठी हा उपक्रम राबविला जाणार आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीmarriageलग्न