रत्नागिरी : जिल्ह्यातील एका जंगलात बिबट्याचे पांढऱ्या रंगाचे दुर्मीळ पिल्लू सापडले आहे. काजूची बाग साफ करताना ते शेतकऱ्यांना दिसले. त्याची आई त्याला घेऊन गेली आहे. त्याच्याविषयी अधिक माहिती मिळवण्यासाठी आता वनखात्याने ट्रॅप कॅमेरे लावले आहेत.
बिबट्याच्या पिल्लांचा रंग बिबट्यासारखाच असतो. मात्र एका जंगलात शेतकऱ्यांना बिबट्याची दोन पिल्ले दिसली, ज्यात एका पिल्लाचा रंग पांढरा होता. त्यांना पिल्ले दिसली, त्याचवेळी मादी बिबट्या तेथे आली आणि ती पिल्लांना घेऊन गेली. वनखात्याने अधिक माहितीसाठी तेथे कॅमेरे लावले आहेत. मात्र पिल्ले कोणत्या भागात सापडली, याची माहिती वनखात्याने गोपनीय ठेवली आहे.