शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये सापडली दुर्मीळ वनस्पती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 17:38 IST

wildlife, ratnagirinews, सह्याद्रीच्या पर्वतरांगातील हरिश्‍चंद्रगड (जि. अहमदनगर) परिसरामध्ये विकोआ गोखलेई या नव्या जागतिकस्तरीय फुलवनस्पतीचा शोध लागला आहे. ही फुलवनस्पती सुर्यफूल कुळातील असून, मराठीमध्ये त्याला सोनसरी असे म्हणतात.

ठळक मुद्देसह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये सापडली दुर्मीळ वनस्पतीदोन वर्षांच्या संशोधनानंतर फुलवनस्पतीचा शोध

राजापूर : सह्याद्रीच्या पर्वतरांगातील हरिश्‍चंद्रगड (जि. अहमदनगर) परिसरामध्ये विकोआ गोखलेई या नव्या जागतिकस्तरीय फुलवनस्पतीचा शोध लागला आहे. ही फुलवनस्पती सुर्यफूल कुळातील असून, मराठीमध्ये त्याला सोनसरी असे म्हणतात. न्यूझिलंड येथून प्रकाशित होणार्‍या फायटोटॅक्सा या जागतिक दर्जाच्या नियतकालिकात या वनस्पतीची नोंद झाली आहे.गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच. पी. टी. आर्टस व आर. वाय. के. सायन्स महाविद्यालय, नाशिक येथील वनस्पतीशास्त्राचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. कुमार विनोद गोसावी त्यांचे संशोधक विद्यार्थी नीलेश माधव, रयत शिक्षण संस्थेच्या राजापूर तालुक्यातील आबासाहेब मराठे महाविद्यालयाचे वनस्पतीशास्त्राचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. अरूण चांदोरे, कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठातील वनस्पतीशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. श्रीरंग यादव यांच्या दोन वर्षांच्या संशोधनानंतर या फुलवनस्पतीचा शोध लागला आहे.हरिश्‍चंद्रगड व परिसरामध्ये डॉ. गोसावी आणि सहकार्‍यांच्या नजरेला ही वनस्पती पडली. त्यांनी त्याचा अभ्यास केला असता, या फुलवनस्पतीचा शोध लागला. ही वनस्पती पश्‍चिम घाट आणि परिसरासह घाटमाथ्यावरील उतारावर वाढते.

या झाडाची उंची १ ते ४ फूट असून, तिला हिरवी पाने आणि गर्द पिवळ्या रंगाची फुले येतात. जगात सोनसरीच्या १४ प्रजाती आहेत. या संशोधनाला गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच. पी. टी. व आर. वाय. के. महाविद्यालय, नाशिकचे प्राचार्य डॉ. व्ही. एन. सूर्यवंशी, वनस्पतीशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. संजय आवटी यांचे सहकार्य मिळाले आहे.

टॅग्स :wildlifeवन्यजीवRatnagiriरत्नागिरी