शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

Ratnagiri- 'रामगड' हा फक्त डोंगरच, खेड तालुक्यातील नव्या किल्ल्याच्या शोधाचा दावा ग्रामस्थांनी फेटाळला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2023 15:15 IST

कुठल्यातरी माहितीच्या आधारावर संभ्रमावस्था करणे हे योग्य नाही

खेड : तालुक्यातील घेरापालगड या किल्ल्याच्या जवळच रामगड असल्याचा दावा काही दुर्ग अभ्यासकांनी केला आहे. मात्र, स्थानिक ग्रामस्थांनी हा दावा फेटाळून लावत रामगड हे घेरापालगडच्या बाजूच्या डोंगराचे फक्त नाव असल्याचे घेरापालगडचे सरपंच तसेच त्या किल्ल्यावरील स्वराज्याच्या काळात असणाऱ्या सैनिकांचे वंशज गोपाळराव कदम यांनी सांगितले.गाेपाळराव कदम यांनी सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरुवातीला त्याच डोंगरावर किल्ला बांधण्याचे काम प्रस्तावित केले होते. मात्र, काही भौगोलिक कारणास्तव त्या ठिकाणाऐवजी शेजारील आता असणाऱ्या खेडमधील घेरापालगड या ठिकाणी किल्ला बांधला. घेरापालगड हा किल्ला टेहळणीसाठी बांधला गेला होता. स्वराज्याची राजधानी असलेला रायगड, दापोली तालुक्यातील हर्णै येथील सुवर्णदुर्ग व सह्याद्रीच्या पर्वत रांगेत असणारा किल्ला रसाळगड हे तीनही किल्ले या घेरापालगड किल्ल्यावरून दिसतात.हर्णै येथील सुवर्णदुर्ग किल्ला आणि खेडमधील रसाळगड किल्ला याच्या मधोमध असणारा हा घेरापालगड किल्ला त्यावेळी विश्रांतीसाठी आणि टेहळणीसाठी तसेच सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून महाराजांनी बांधला होता. इतिहास संशोधक या ठिकाणी येऊन या किल्ल्याच्या व्यथा मांडत असेल. या किल्ल्याबाबत असणारे संदर्भ शोधत असेल तर त्यांचे स्वागत आहे. मात्र, कुठल्यातरी माहितीच्या आधारावर संभ्रमावस्था करणे हे योग्य नाही.

त्यांना जर काही संदर्भ सापडले असतील तर त्यांनी सर्वात आधी ऐतिहासिक गाव असलेल्या घेरापालगड किल्ले माची या ठिकाणी असणाऱ्या जुन्या लोकांना विचारणे अपेक्षित होते. पूर्वापार आम्ही जे ऐकत आलो, त्यानुसार घेरापालगडच्या पश्चिमेला असणारा डोंगराचा सुळका या ठिकाणी रामगड म्हणून पूर्वापार पिढ्यानपिढ्या प्रचलित परिसर आहे, असेही कदम यांनी सांगितले.

घेरापालगड किल्ल्याची अवस्था आज दयनीय आहे. याकडे सर्वात आधी शासनाने लक्ष केंद्रित करावे. ज्या ठिकाणी काहीच नाही, त्याठिकाणी काहीतरी होतं, असे सांगून संभ्रम निर्माण करू नये. तसेच न पटणारी माहिती समोर आणून छत्रपतींच्या इतिहासाला उजाळा मिळणार नाही तर छत्रपतींनी बांधून उभे केलेले किल्ले सर्वात आधी दुरुस्त करावेत. त्यांची डागडुजी करावी. - गाेपाळराव कदम, सरपंच, घेरापालगड.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीFortगड