शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
3
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
4
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
5
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
6
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
7
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
8
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
9
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
10
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
11
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
12
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
13
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
14
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
15
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
16
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
17
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
18
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
19
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
20
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर

राजापुरात लढत तिरंगी, सामना मात्र दुरंगीच, राजापूर नगराध्यक्ष निवडणूक रंगात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2018 15:49 IST

राजापूर नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेस आघाडी विरुध्द स्वतंत्रपणे लढणाऱ्या शिवसेना, भाजपमुळे मागीलप्रमाणेच तिरंगी लढत होणार आहे. यामध्ये खरा सामना हा काँग्रेस आघाडी विरुध्द शिवसेना असाच होणार असल्याने आगामी काळात होणाऱ्या विधानसभा व लोकसभा निवडणुका लक्षात घेता या निवडणुकीला प्रचंड महत्व प्राप्त झाले आहे.

ठळक मुद्देराजापुरात लढत तिरंगी, सामना मात्र दुरंगीचराजापूर नगराध्यक्ष निवडणूक रंगात- भाजपच्या बंडखोराची माघार

राजापूर : राजापूर नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेस आघाडी विरुध्द स्वतंत्रपणे लढणाऱ्या शिवसेना, भाजपमुळे मागीलप्रमाणेच तिरंगी लढत होणार आहे. यामध्ये खरा सामना हा काँग्रेस आघाडी विरुध्द शिवसेना असाच होणार असल्याने आगामी काळात होणाऱ्या विधानसभा व लोकसभा निवडणुका लक्षात घेता या निवडणुकीला प्रचंड महत्व प्राप्त झाले आहे.जुलै महिन्याच्या १५ तारखेला ही निवडणूक होत आहे. त्यामध्ये काँग्रेस आघाडीकडून प्रभारी नगराध्यक्ष अ‍ॅड. जमीर खलिफे, शिवसेनेकडून माजी नगरसेवक अभय मेळेकर व भाजपकडून त्यांचे पालिकेतील एकमेव नगरसेवक गोविंद चव्हाण रिंगणात आहेत. तिन्ही उमेदवारांचा जोमाने प्रचार सुरु आहे. त्यांचे पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ते आपापल्या प्रभागात प्रचारकार्यात सहभागी झाले आहेत.

शिवसेनेकडून आमदार राजन साळवी यांच्यासह त्यांचे पदाधिकारी प्रचारात उतरले असतानाच काँग्रेस आघाडीकडून विधानपरिषद सदस्या अ‍ॅड. हुस्नबानू खलिफे, राष्ट्रवादीचे माजी युवक उपाध्यक्ष अजित यशवंतराव व दोन्ही पक्षांचे पदाधिकारी किल्ला लढवत आहेत.भाजपमधून बंडखोरी केलेल्या शीतल पटेल यांच्या माघारीनंतर भाजपच्या तंबूतून सुटकेचा नि:श्वास सोडण्यात आला असून, आता भाजपचे कार्यकर्तेदेखील प्रचारात सहभागी झाले आहेत. मात्र, उमेदवारी देण्यावरून भाजपमध्ये जे नाट्य घडले होते, ते पाहता दुभंगलेली मने पुन्हा सांधली जाऊन या पक्षाकडून एकसंघ प्रचार होईल का? हादेखील तेवढाच महत्त्वाचा मुद्दा आहे.नगर परिषदेचे प्रभारी नगराध्यक्ष व काँग्रेस आघाडीचे उमेदवार अ‍ॅड. जमीर खलिफे हे मागील एक दशक नगरसेवक म्हणून कार्यरत असून, त्यांनी यापूर्वी पालिकेत सभापतीपदे भूषवली आहेत. यावेळी ते उपनगराध्यक्ष म्हणून कार्यरत असतानाच नगराध्यक्ष पदाचा अतिरीक्त कार्यभार त्यांच्याकडे आला.

आपल्या मागील कार्यकालात शहरवासीयांसाठी त्यांनी चांगले योगदान दिले आहे. पाण्याच्या प्रश्नासह रस्ते व अन्य मूलभूत सुविधा याकडे त्यांनी विशेष लक्ष दिले होते. शिवसेनेचे उमेदवार अभय मेळेकर यांनी यापूर्वी नगरसेवक म्हणून काम पाहिले आहे. पक्षाचे प्रतोद म्हणूनही ते कार्यरत होते.मागील वेळीही मेळेकर यांनी थेट नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवली होती. पण, ते पराभूत झाले होते. शिवसेनेने पुन्हा एकदा त्यांना उमेदवारी देऊन संधी दिली आहे. भाजप उमेदवार गोविंद चव्हाण हे पालिकेतील एकमेव नगरसेवक असून, पाणी सभापती म्हणून कार्यरत आहेत.

कडाक्याचा उन्हाळा असताना शहरात पाण्याची टंचाई जाणवू नये म्हणून त्यांनी स्वत: खबरदारी घेतली होती. या कामांच्या जोरावर हे तिन्ही उमेदवार आपले नशीब आजमावत असून, खरा सामना हा शिवसेना विरुध्द काँग्रेस आघाडी असाच रंगणार आहे.निवडणुकीत शहरातील विकासाच्या मुद्द्यावर उमेदवारांकडुन भर देण्यात आला आहे. शहराला भेडसावणारा पाणीप्रश्न, रस्ते, वीज, घनकचरा व्यवस्थापन यासहित अनेक समस्या मागील अनेक वर्षे भेडसावत असून, त्या सोडविण्यासाठी आपण कोणते प्रयत्न करणार आहोत ते उमेदवारांकडून सांगितले जात आहे.आता काही दिवस शिल्लक असून, कोणत्याही उमेदवाराची पहिली फेरी अजून पूर्ण झालेली नाही. शिवाय मागील काही दिवसांत पावसाचा जोर वाढल्याने त्याचादेखील अडथळा सर्व उमेदवारांना बसत आहे. मतदारांच्या वैयक्तिक गाठीभेटींसह सोशल मीडियाचाही प्रचारासाठी वापर होत आहे.साळवी - खलिफे यांची प्रतिष्ठा पणालाही निवडणूक शिवसेनेचे आमदार राजन साळवी व काँग्रेसच्या विधानपरिषद सदस्या अ‍ॅड. हुस्नबानू खलिफे यांच्यासाठी अत्यंत प्रतिष्ठेची आहे. राजापूर नगर परिषदेत सतरापैकी शिवसेनेचे सर्वाधिक आठ नगरसेवक असल्याने नगराध्यक्ष पदाचा उमेदवार निवडून आणणे मोठी जबाबदारी आमदार साळवी व त्यांच्या सहकाºयांवर येऊन पडली आहे.भाजपची नेतेमंडळी येणार ?भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी विधानपरिषद सदस्य प्रसाद लाड व कोकण पदवीधर मतदारसंघातून विजयी झालेले आमदार निरंजन डावखरे येणार असल्याची चर्चा आहे. आमदार राजन साळवी हे पावसाळी अधिवेशनासाठी नागपूरला रवाना झाले असून, सुट्टीच्या काळात राजापुरात प्रचारासाठी दाखल होणार आहेत. 

टॅग्स :nagaradhyakshaनगराध्यक्षRatnagiriरत्नागिरी