शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

केंद्राच्या कृषी विधेयकाचा राजापूर युवक काँग्रेसकडून निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2020 17:10 IST

केंद्रातील भाजपा सरकारने शेतकरी विरोधी कृषी विधेयक आणून शेतकऱ्यांवर अन्याय केला आहे. याच्या निषेधार्थ राजापूर तालुका युवक काँग्रेसतर्फे या विधेयकाची शेतकऱ्यांच्या उपस्थितीत होळी करण्यात आली.

ठळक मुद्देकेंद्राच्या कृषी विधेयकाचा राजापूर युवक काँग्रेसकडून निषेधशेतकऱ्यांच्या उपस्थितीत विधेयकाची होळी

राजापूर : केंद्रातील भाजपा सरकारने शेतकरी विरोधी कृषी विधेयक आणून शेतकऱ्यांवर अन्याय केला आहे. याच्या निषेधार्थ राजापूर तालुका युवक काँग्रेसतर्फे या विधेयकाची शेतकऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात आली.युवक काँग्रेसचे मंदार सप्रे यांच्या नेतृत्वाखाली राजापूर तालुका युवक काँग्रेसने शेतकऱ्यांच्या उपस्थितीत या विधेयकाची होळी करण्यात आली. या विधेयकामुळे कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये कार्यरत असणाऱ्या अनेक अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण होणार आहे.

बाजार समित्या बंद केल्यास मोठ्या कंपन्यांच्या निर्णयानुसार शेतकऱ्यांना मोबदला मिळेल. अशा वेळी कंपन्या आपल्या गरजेनुसार मालाच्या किंमती ठरवू शकतात. यामुळे शेतकऱ्यांवर अन्याय होणार आहे.

अत्यावश्यक वस्तू कायद्यातील दुरुस्तीमुळे व्यापारी गरजेपेक्षाही जास्त प्रमाणात मालाचा साठा करु शकतात. त्यांच्यावर कारवाई करता येणार नाही. या साठेबाजीमुळे सामान्य नागरिकांना महागाईची झळ बसेल, असे मंदार सप्रे यांनी म्हटले आहे.या समस्या असल्यामुळे या विधेयकाचा काँग्रेस पक्षातर्फे जाहीर निषेध करण्यात आला. यावेळी युवा नेते संजय कपाळे, बबन राठवड, प्रकाश गराठे, प्रकाश आरावकर, बंडू कानडे, मनोहर आडिवरेकर, अमोल आडिवरेकर, अनिल नाफडे उपस्थित होते.

टॅग्स :congressकाँग्रेसAgriculture Sectorशेती क्षेत्रRatnagiriरत्नागिरी