शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

राजापूर तालुक्यात ७ शाळा शून्य शिक्षकी, शिक्षण विभाग तोंडघशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2019 12:53 IST

शिक्षकांच्या बदल्यानंतर राजापूर तालुक्यातील ७ शाळा शून्य शिक्षकी झाल्याचे आजच्या जिल्हा परिषद स्थायी समितीच्या सभेत पदाधिकाऱ्यांनीच समोर आणल्याने शिक्षण विभाग तोंडघशी पडला. चिपळूणातील प्राथमिक शाळा चिंचनाका या शाळेतून विद्यार्थी अन्य शाळेत हलविण्याचा निर्णय झाल्याने गेल्या ही शाळा वाचविण्याचा चाललेला प्रयत्न अखेर फोल ठरला.

ठळक मुद्देराजापूर तालुक्यात ७ शाळा शून्य शिक्षकी, शिक्षण विभाग तोंडघशीचिंचनाका शाळेतून विद्यार्थी हलविण्याचा निर्णय

रत्नागिरी : शिक्षकांच्या बदल्यानंतर राजापूर तालुक्यातील ७ शाळा शून्य शिक्षकी झाल्याचे  जिल्हा परिषद स्थायी समिती पदाधिकाऱ्यांनीच समोर आणल्याने शिक्षण विभाग तोंडघशी पडला. चिपळूणातील प्राथमिक शाळा चिंचनाका या शाळेतून विद्यार्थी अन्य शाळेत हलविण्याचा निर्णय झाल्याने गेल्या ही शाळा वाचविण्याचा चाललेला प्रयत्न अखेर फोल ठरला.गेल्या काही महिन्यांपासून जिल्हा परिषद प्राथमिक शाळांच्या शिक्षकांच्या बदल्या गाजत होत्या़ समानीकरणाच्या मुद्यावर या बदल्या करण्यात आल्या होत्या़ मात्र, या बदल्या झाल्यानंतर गोंधळ उडाला होता़ या बदल्या करताना सुगम-दुर्गम शाळांचा मुद्दा सुरुवातीला पुढे आला होता़ तोही शासनाने मान्य न करताच या बदल्या केल्या़ त्यानंतर झालेल्या शिक्षक बदल्यांमध्येही घोळ झाल्याचे उघड झाले़. त्यामुळे शिक्षक संघटना तसेच अनेक शिक्षकांनी त्यावर आक्षेप घेतला होता़.

जिल्हा परिषद प्रशासनानेही या बदल्यानंतर एकही शाळा शून्य शिक्षकी राहणार नाही, असा दावा केला होता़ मात्र, अन्यायग्रस्त शिक्षकांचे समुपदेशन दोनच दिवसांपूर्वी झाले़ त्यानंतर राजापूर तालुक्यातील ७ शाळा शून्य शिक्षकी झाल्याचे समोर आले आहे़. शिक्षण विभागाने शिक्षक बदल्यानंतर शून्य शिक्षकी एकही राहणार नाही, असा केलेला दावाही फोल ठरला आहे़. 

चिपळूण येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिंचनाका या शाळेचा विषय गेले अडीच वर्षे स्थायी समितीच्या सभेत गाजत होता़. ही शाळा १०० वर्षापूर्वीची ऐतिहासिक शाळा असल्याने ती सुरुच ठेवावी, अशी मागणी विरोध पक्षनेते विक्रांत जाधव यांनी अनेकदा केली होती़ मात्र, या शाळेच्या आॅडिट अहवालामध्ये ती धोकादायक असून विद्यार्थ्यांच्या जिवितेस धोका असल्याचे म्हटले आहे़,  शाळा व्यवस्थापन समितीने ही शाळा धोकादायक नसल्याचा अहवाल दिला आहे़ तरीही मुलांच्या जिवितेस धोका असल्याने या शाळेतील विद्यार्थी अन्य जवळच्या शाळेत हलविण्याचा निर्णय  घेण्यात आला. त्यावेळी विरोधी पक्षनेते विक्रांत जाधव आणि नेत्रा ठाकूर यांनी याला विरोध केला़, त्यामुळे ही शाळा आता इतिहास जमा होणार आहे.

टॅग्स :Teacherशिक्षकRatnagiriरत्नागिरी