शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
4
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
5
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
6
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
7
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
8
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
9
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
10
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
11
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
12
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
13
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
14
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
15
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
16
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
17
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
18
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
19
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
20
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
Daily Top 2Weekly Top 5

राजापुरात पुराच्या पाण्यात एकजण गेला वाहून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 11:29 IST

Rain Ratnagiri Rajapru : रविवारपासून पडणाऱ्या पावसामुळे राजापूर तालुका आणि शहर परिसरात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून, सोमवारी सकाळी ७.३० च्या दरम्याने एकजण पुराच्या पाण्यात वाहून गेला आहे.पावसामध्ये अर्जुना आणि कोदवली नद्यांना आलेल्या पुराच्या पाण्याने यावर्षी दुसर्‍यांदा शहराला वेढा घातला आहे.

ठळक मुद्दे शहराला पुराच्या पाण्याचा वेढा मुसळधार पावसामुळे अर्जुना, कोदवली नद्यांचे पाणी वाढले

विनोद पवारराजापूर : रविवारपासून पडणाऱ्या पावसामुळे राजापूर तालुका आणि शहर परिसरात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून, सोमवारी सकाळी ७.३० च्या दरम्याने एकजण पुराच्या पाण्यात वाहून गेला आहे.पावसामध्ये अर्जुना आणि कोदवली नद्यांना आलेल्या पुराच्या पाण्याने यावर्षी दुसर्‍यांदा शहराला वेढा घातला आहे.

रविवारी रात्री उशिरा जवाहर चौकामध्ये धडक देणार्‍या पुराच्या पाण्याने सोमवारी सकाळपर्यंत ठिय्या मांडला आहे. जवाहर चौकात पुराच्या पाण्याचा सुमारे सात तासाहून अधिक काळ शहराला वेढा राहिला आहे. संततधारा पावसाने पूरस्थितीमध्ये वाढ होत असून, शहरासह तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. वाढत्या पुराच्या पाण्याने व्यापार्‍यांची मात्र, त्रेधातिरपीट उडविली आहे.राजापूरच्या तहसीलदार प्रतिभा वराळे यांनी माहिती देताना सांगितले की, पुराच्या पाण्यात कोंढेतड पुलाजवळून सोमवारी सकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास एकजण वाहून गेला असून, त्याचा शोध सुरू झाला आहे. दरम्यान तालुक्यातील जवळच्या सर्व गावांत कोणी बेपत्ता असल्यास तत्काळ माहिती पोलीस स्थानकावर द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.शहरातील बंदरधक्का, मुन्शीनाका परिसर, वरचीपेठ परिसर, शिवाजीपथ आदी भाग पुराच्या पाण्याखाली आहे. तर, शहरालगतचा शीळ, गोठणेदोनिवडे-चिखलगाव आदी गावांचा संपर्क तुटला आहे. तर, उन्हाळे, दोनिवडे पंचक्रोशीतील गावांना जोडणारा रस्ताही पाण्याखाली गेल्याने त्या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. नद्यांच्या काठावरील भातशेती पाण्याखाली गेली आहे. दरम्यान, नगराध्यक्ष अ‍ॅड. जमीर खलिफे, तहसीलदार प्रतिभा वराळे आदींनी शहरातील पूरस्थितीची पाहणी करून लोकांसह व्यापार्‍यांना सतर्कततेचा इशारा दिला आहे.शिवाजी पथ रस्त्यावरील अनेक दुकानांमध्ये पुराचे पाणी घुसले. बाजारपेठेतील अनेक दुकानंमध्ये पुराचे पाणी घुसले आहे. पुराच्या पाण्याचा वेग आणि पातळी सातत्याने वाढत असल्याने सावध झालेल्या व्यापार्‍यांनी दुकानामध्ये पाणी घुसण्याच्या शक्यतेने तातडीने दुकानातील माल सुरक्षित ठिकाणी रात्रीच हलविला. त्यामुळे व्यापार्‍यांचे फारसे नुकसान झालेले नाही.

शहरानजीकच्या शीळ, गोठणेदोनिवडे, उन्हाळे, दोनिवडे, चिखलगाव, पन्हळेतर्फ राजापूर, गोवळ, शिवणे आदी गावांमधील भातशेती आणि गावांना जोडणारे रस्ते पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे या गावांमधीलही जनजीवन विस्कळीत झाले आहे.

टॅग्स :RainपाऊसRajapurराजापुरRatnagiriरत्नागिरी