शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
2
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
3
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
4
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
5
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
6
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
7
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
8
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
9
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
10
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
11
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
12
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
13
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
14
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
15
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
16
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
17
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
18
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
19
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे

राजापूरच्या सौंदर्यात शिवस्मारकाची भर

By admin | Updated: February 19, 2016 00:18 IST

जवाहरचौक सुशोभिकरण : शिवपुतळ्याचा इतिहासही शिवरायांसारखाच खडतर...

राजापूर : शहरातील जवाहर चौक येथे असणारे शिवस्मारक म्हणजे राजापूरवासीयांची अस्मिता! ऊन, वारा, पाऊस अन् पूर यांचा सुमारे ६ दशके सामना करत मोठ्या दिमाखात राजापूर शहराच्या मध्यभागी उभ्या असणाऱ्या शिवपुतळ्याचे सुशोभिकरण व्हावे, अशी मागणी राजापुरातील शिवप्रेमींमधून वारंवार करण्यात येत होती. त्यामुळे राजापूर नगर परिषदेने यावर्षी शिवस्मारकाच्या नूतनीकरणाला प्रारंभ केला आहे.सन १९६०च्या आसपास शिवप्रेमीच्या मनातील खंत ओळखून तत्कालीन नगराध्यक्ष शांताराम विठ्ठल नार्वेकर यांनी सभागृहात हा विषय मांडला व जवाहर चौकातील टिळेकर यांच्या तुलसी वृंदावनावर शिवपुतळा बसवण्याचे निश्चित केले. शासनाकडून राजापूर नगर परिषदेला शिवस्मारकासाठी निधीची तरतूदही लगेच करण्यात आली. राजापूर नगर परिषदेच्या दप्तरी शिवस्मारक १९६२ साली उभारण्यात आल्याची नोंद असली तरी साधारणत: १९६३ - ६४ च्या काळात शिवस्मारक उभे राहिल्याचे येथील जाणकार मंडळी सांगतात. त्याकाळात शिवस्मारकाचा विषय सभागृहात आल्यानंतर नगर परिषदेच्या सभागृहात त्याच जागेत शिवपुतळा कोठे बसवायचा, यावरून मोठे राजकारणही झाल्याचे अनेक जाणकार मंडळी सांगतात. जवाहर चौकात शिवस्मारक उभारण्याचे निश्चित करताना त्याठिकाणी पूर्णाकृती शिवपुतळा बसवण्याचेही निश्चित करण्यात आले होते. साधारणत: १९६३ - ६४ च्या काळात शिवपुतळ्याचे अनावरण करण्याचे ठरले. पूर्णाकृती शिवपुतळाही राजापुरात बंद पेटीतून दाखल झाला. मात्र, शिवपुतळा अनावरणच्या अगोदर शिवपुतळा पाहिल्यानंतर शिवपुतळ्याच्या बाबतीत काही अशुभ संकेत मिळाल्याने आता काय करायचे, असा प्रश्न नगर परिषद प्रशासन व शिवप्रेमी नागरिकांना पडला होता. त्याकाळी कार्यक्रम पुढे ढकलायचा, पुन्हा तेवढा संपर्क करणे, दळणवळण व दूरध्वनीची साधने उपलब्ध नसल्यामुळे शक्य नव्हते. शिवपुतळ्याच्या विषयावरून सभागृहात आधीच राजकारण झाल्यामुळे आता शिवस्मारक उभे राहिले नाही तर शिवस्मारक पुन्हा कधीच उभे राहू शकणार नाही, अशी खंत अनेकांनी व्यक्त केली होती.त्याकाळात महाराष्ट्राच्या सरकारवर पकड असणारे यशवंतराव चव्हाण व तात्या भूकर यांचे संबंध अतिशय घनिष्ठ होते. त्यामुळे ही अडचण त्यांनी यशवंतरावांकडे बोलून दाखवली. त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक कारखान्यात कोठे पूर्णाकृती शिवपुतळा तयार आहे का, याची माहिती घेतली. मात्र, त्यात त्यांना अपयश आले. अखेर यशवंतरावांनी आपल्या गावी बसवण्यासाठी नेण्यात आलेला अर्धाकृती शिवपुतळा देण्याचे मान्य केले. त्यानंतर तात्यांनी स्वत: साताऱ्यात जाऊन तो शिवपुतळा राजापुरात आणला अन् ठरल्या दिवशी, ठरल्यावेळी जवाहर चौकात शिवपुतळ्याचे अनावरण करण्यात आले. त्यानंतर गेली अनेक दशके जवाहर चौकात शिवपुतळा मोठ्या दिमाखात उभा आहे. ऊन, वारा, पाऊस अन् दरवर्षी राजापूर शहराला बसणारा पुराचा वेढा याचा सामना करत या शिवपुतळ्याने राजापुरातील अनेक गोड कडू घटना अनुभवल्या आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून राजापुरातील शिवप्रेमींमधून शिवस्मारकाचे सुशोभिकरण करण्याची मागणी करण्यात येत होती. त्या मागणीचा विचार करुन नगर परिषदेने सुशोभिकरण हाती घेतले आहे. या कामासाठी राजापुरातील शिवप्रेमी नागरिकांची समिती गठीत करण्यात आली असून, त्या समितीच्या माध्यमातून उर्वरित निधी उभा करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)जागतिक बाजारपेठ : शिवस्मारकाची प्रतीक्षाचशिवकालीन युगानंतर ब्रिटिशकालीन युगात राजापूर ही जागतिक बाजारपेठ म्हणून उदयास आली. या काळात राजापुरी पंचे, राजापुरी खोबरे अन् राजापुरी हळद जगाच्या पाठीवर पोहोचली. स्वराज्य निर्मितीत इंग्रजांनी बाधा आणण्याचे काम केल्यानंतर छत्रपती शिवरायांनी राजापूरवर स्वारी करुन इंग्रजांची वखार लुटली. त्यावेळी राजापुरात शिवाजी महाराज स्वत: आल्याच्या नोंदी इतिहासात मिळतात, तर राजापूरच्या प्रसिध्द गंगाक्षेत्रीही महाराजांनी भेट दिल्याचे इतिहास सांगतो. याच राजापूरच्या स्वारीत महाराजांना स्वराज्यासाठी बाळाजी आवजीसारखे हिरे सापडले. पण, शिवकाळानंतर इंग्रज राजवटीनंतर संपूर्ण स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देखिल राजापूरमध्ये कुठेही शिवस्मारक नव्हते.स्मारकाच्या निधीत भरशिवस्मारक समितीने कलेल्या आवाहनाला समाजातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, शिवस्मारकाच्या निधीमध्ये भर पडत आहे.