रत्नागिरी : जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव यांनी राजन सुर्वे यांची राष्ट्रवादीच्या रत्नागिरी तालुकाध्यक्षपदी निवड झाल्याचे जाहीर केले. आमदार शेखर निकम यांच्या उपस्थितीत जिल्हाध्यक्ष जाधव यांनी सुर्वे यांना नियुक्तीपत्र दिले.
आमदार निकम यांनी चर्चेदरम्यान रत्नागिरी तालुक्यामध्ये विकासकामांसाठी पक्षाकडून जे काही सहकार्य लागेल ते मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे सांगितले. तालुक्यामध्ये पक्षसंघटना वाढीसाठी तसेच तालुक्याच्या विकासासाठी चांगल्या प्रकारे काम सुरू होईल, असे प्रांतिक सदस्य बशीर मुर्तुझा आणि सुदेश मयेकर यांनी या वेळी सांगितले. ही निवड सावर्डे येथे राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्षा चित्रा चव्हाण, रत्नागिरी नगर परिषदेचे पक्षप्रतोद सुदेश मयेकर, प्रांतिक सदस्य बशीर मुर्तुझा, तालुका युवक अध्यक्ष सिद्धेश शिवलकर, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष जुबेर काझी, महिला विधानसभा क्षेत्राध्यक्ष नसीमा डोंगरकर, शहराध्यक्षा नेहाली नागवेकर, तालुका अल्पसंख्याक अध्यक्ष मेहबुब मोगल व अन्य पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झाली. या निवडीबद्दल खासदार सुनील तटकरे यांनीही दूरध्वनीद्वारे सुर्वे यांनी शुभेच्छा दिल्या.
----------------------
राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षपदी राजन सुर्वे यांची निवड केल्याबद्दल त्यांना आमदार शेखर निकम यांच्या हस्ते निवडीचे पत्र देण्यात आले. या वेळी जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव, बशीर मुर्तुझा, सुदेश मयेकर उपस्थित हाेते़