शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

राज ठाकरे करणार कातळशिल्पांची पाहणी, अश्मयुगीन शिल्पे वाचवण्याची धडपड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2020 15:21 IST

Raj Thackeray, ratnagirinews कोकणातील कातळशिल्पाबाबत वाचून होतो, सोशल मीडियाव्दारे फोटोही पाहिले आहेत. मात्र, प्रत्यक्ष भेट देऊन त्याबाबत अधिक माहिती जाणून घेण्याची इच्छा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रकट केली आहे.

ठळक मुद्देअश्मयुगीन शिल्पे वाचवण्याची धडपडकोकणातील पर्यटन विकासाबाबतही चर्चा

रत्नागिरी : कोकणातील कातळशिल्पाबाबत वाचून होतो, सोशल मीडियाव्दारे फोटोही पाहिले आहेत. मात्र, प्रत्यक्ष भेट देऊन त्याबाबत अधिक माहिती जाणून घेण्याची इच्छा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रकट केली आहे.कोकणातील अष्मयुगीन कातळशिल्प अनेकांसाठी आकर्षणाचा विषय बनला आहे. खोदचित्रांचे शोधकर्ते सुधीर रिसबुड, धनंजय मराठे आणि डॉ. सुरेंद्र ठाकुरदेसाई या अमूल्य सांस्कृतिक ठेव्याचे संवर्धन व्हावे म्हणून धडपडत आहेत.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना याबाबत माहिती मिळाल्याने त्यांनी या कार्यकर्त्यांना भेटीचे निमंत्रण दिले. शिवाय कातळशिल्पाबाबत माहिती जाणून घेतली. त्यांच्यासमवेत झालेल्या बैठकीमध्ये शोधकर्ते सुधीर रिसबुड, धनंजय मराठे यांनी कोकणातील कातळ खोद चित्र रचनेबाबत सविस्तर माहिती विषद केली.कातळशिल्प संरक्षण संवर्धन याबाबत शासन प्रशासन पातळीवर चाललेल्या कामाची माहिती दिली तसेच व्यक्तिगत पातळीवर आणि निसर्गयात्री संस्था, रत्नागिरीच्या माध्यमातून ऐतिहासिक, प्रागैतिहासिक तसेच जैवविविधतेचे संरक्षण संवर्धन करुन त्याला पर्यटन क्षेत्राची जोड देत पर्यटन विकास आणि स्थानिक रोजगार निर्मितीसाठी हाती घेतलेल्या कार्याची माहिती दिली. पर्यटनवाढीला या शिल्पांचा मोठा आधार होणार आहे, हे सांगतानाच कोकणातील एकंदर पर्यटन विकासाबाबतही यावेळी चर्चा झाली.काही मौलिक बाबी राज ठाकरे यांनी मांडल्या. तसेच कातळशिल्पाबाबतच्या कामाचे कौतुक केले. लवकरच या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देण्याची इच्छा व्यक्त केली. यावेळी इन्फिगो आय केअर सेंटरचे संचालक डॉ. श्रीधर ठाकुरदेसाई, धनंजय पराडकर, उद्योजक सुहास ठाकुरदेसाई, कौस्तुभ सावंत, वास्तूविशारद मकरंद केसरकर उपस्थित होते.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेRatnagiriरत्नागिरीkonkanकोकण