शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

राज ठाकरेंचा चिपळूण दौरा रद्द, मुंबईतील मेळाव्यात भूमिका मांडणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2023 11:50 IST

गेल्या पाच वर्षांत महाराष्ट्राची राजकीय स्थिती चिखलमय

रत्नागिरी : बदलत्या राजकीय परिस्थितीमुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा ८ जुलैचा चिपळूण दाैरा पुढे ढकलला आहे. मुंबईतील मेळाव्यात ते आपली भूमिका मांडतील. त्यानंतर ते राज्याचा दाैरा करतील. त्याचवेळी ते जिल्हा दाैऱ्यावर येतील, अशी माहिती मनसेचे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर यांनी रत्नागिरीत पत्रकारांशी बाेलताना दिली.मनसेच्या रत्नागिरीतील पदाधिकाऱ्यांची गुरुवारी (६ जुलै) रत्नागिरीत बैठक आयाेजित केली हाेती. या बैठकीनंतर वैभव खेडेकर पत्रकारांशी बाेलत हाेते. यावेळी त्यांनी तर्क- वितर्क, राज्याच्या बैठकीत मांडलेली मत याचा खुलासा करण्यासाठी राज ठाकरे मुंबईत मेळावा घेणार आहेत. या सगळ्याला उत्तर या मेळाव्यात देतील, असे स्पष्ट केले.महाराष्ट्राने देशाला दिशा दिली आहे. सुसंस्कृत महाराष्ट्र आहे. आजवर अनेक क्रांती झाल्या त्याचे नेतृत्व महाराष्ट्राने केले. मात्र, गेल्या पाच वर्षांत महाराष्ट्राची राजकीय स्थिती चिखलमय करून टाकलेली आहे. महाराष्ट्रातील जनतेला हे आता नकाेसे झाले आहे. त्यामुळे एक संधी राज ठाकरे यांना द्यावी, अशी भूमिका जनतेने घेतली आहे, असे खेडेकर म्हणाले.उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र येण्याबाबत त्यांना विचारले असता वैभव खेडेकर म्हणाले की, युती किंवा आघाडी करण्याचा निर्णय राज ठाकरेच घेऊ शकतात. याबाबत राज ठाकरे मुंबईतील मेळाव्यात बाेलतील. तिथून ही काेंडी फुटेल असे वाटते. ज्यापद्धतीने राष्ट्रवादी आणि शिवसेना या दाेन भिन्न विचारांचे सरकार बनू शकते किंवा भाजप आणि राष्ट्रवादीचे सरकार बनू शकते, तसेच या दाेन भावांनी एकत्र येण्याबाबतचा सूर उमटत आहे. राजकारणात काेणत्याही शक्यता नाकारता येत नाही, असेही खेडेकर म्हणाले.वेगळा पायंडा राज्यात पाहायला मिळतोय. पक्षाचे नेतृत्व, निष्ठा आणि चळवळ हे सगळे लयास जातील. राज्यात एक वेगळा पायंडा पडेल. या घडामाेडींवरून उच्च न्यायालय पक्षांतर्गत कायदा अधिक कडक करण्याबाबत विचार करेल, असेही खेडेकर म्हणाले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीRaj Thackerayराज ठाकरे