शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा रात्रीस खेळ चाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 12:55 IST

Rain Ratnagiri : रत्नागिरी जिल्ह्यात यावर्षी पावसाचे प्रमाण चांगले असून, गेल्या वर्षाच्या (जून २०२०) तुलनेत सर्वच तालुक्यांमध्ये आतापर्यंत चांगल्या पावसाची नोंद झाली आहे. जूनच्या पहिल्या ३ आठवड्यांमध्ये जिल्ह्यात सरासरी ८०८.२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. गतवर्षी याच कालावधीत ६२१.८३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती. गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेणाऱ्या पावसाने बुधवारी रात्री जोरदार पडण्यास सुरूवात केली़ सकाळपर्यंत पावसाचे थैमान सुरूच होते.

ठळक मुद्देरत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा रात्रीस खेळ चालेगतवर्षीपेक्षा सरासरी पावसाचे प्रमाण अधिक

रत्नागिरी : जिल्ह्यात यावर्षी पावसाचे प्रमाण चांगले असून, गेल्या वर्षाच्या (जून २०२०) तुलनेत सर्वच तालुक्यांमध्ये आतापर्यंत चांगल्या पावसाची नोंद झाली आहे. जूनच्या पहिल्या ३ आठवड्यांमध्ये जिल्ह्यात सरासरी ८०८.२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. गतवर्षी याच कालावधीत ६२१.८३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती. गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेणाऱ्या पावसाने बुधवारी रात्री जोरदार पडण्यास सुरूवात केली़ सकाळपर्यंत पावसाचे थैमान सुरूच होते.गेल्या ३ आठवड्यात सर्वाधिक पाऊस खेड तालुक्यात १११९.३ मिलीमीटर नोंदला गेला. मागील वर्षी या तालुक्यात याच कालावधीत ४६४.१२ मिलीमीटर पाऊस नोंदला गेला होता. जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यात ७२६ मिलीमीटर (४६३.३२), दापोली ५३०.६ मिलीमीटर (५६०.६९), खेड १११९.३ मिलीमीटर (४६४.१२), गुहागर ९३३.५ मिलीमीटर (६५८.७), चिपळूण ७५२.७ मिलीमीटर (५६७.०६), संगमेश्वर ८४७.८ मिलीमीटर (७२७.१), रत्नागिरी ९३१ मिलीमीटर (७१८.८), लांजा ७२५.६ मिलीमीटर (६६७.४) आणि राजापूर तालुक्यात ६५८.५ मिलीमीटर (७६९.२५) इतका पाऊस पडला आहे़जिल्ह्यातील ९ तालुक्यांपैकी फक्त दापोली आणि राजापूर तालुक्यात मागील वर्षीच्या तुलनेत काही प्रमाणात कमी पाऊस आहे. मागील वर्षी जिल्ह्यात ६२१.८३ मिलीमीटरच्या सरासरीने ५५९६.४४ मिलीमीटर पाऊस झाला. चालू वर्षात ८०८.०२ मिलीमीटरच्या सरासरीने ७२७२.२० मिलीमीटर अर्थात १६९५.७६ मिलीमीटर सरासरी पाऊस अधिक आहे.दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून पावसाचे प्रमाण कमी राहिले आहे़ सरीवर कोसळणाऱ्या पावसामुळे श्रावणसरी कोसळत असल्याचा आनंद अनुभवावा लागत आहे़ मात्र, बुधवारी रात्रीपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे़ रात्रभर कोसळणाऱ्या पावसामुळे नद्यांच्या पाणीपातळीत पुन्हा वाढ झाली आहे़ गुरूवारी सकाळी पुन्हा पावसाने विश्रांती घेतल्याने सखली भागात साचलेले पाणी ओसरले होते़ पाऊस थांबताच स्त्रियांनी वटपौर्णिमेनिमित्त वडाची पूजा करून घेतली़ 

टॅग्स :RainपाऊसRatnagiriरत्नागिरी