शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी जिल्ह्यात पावसाची संततधार सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 14:57 IST

Rain Ratnagiri : रत्नागिरी जिल्ह्यात गेले पाच दिवस पावसाची संततधार सुरूच आहे. पावसामुळे अनेक ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. राजापूर शहरात बुधवारी पडलेल्या मुसळधार पावसामुळे शहरात पुराचे पाणी ओसरले आहे. जिल्ह्यात अनेक भागात पावसाची संततधार सुरूच असली तरी नद्यांची पाणी पातळी वाढलेली नाही.

ठळक मुद्देराजापुरातील पूर ओसरला जिल्ह्यात सरासरी ८९.०७ मिलीमीटर पावसाची नोंद

रत्नागिरी : जिल्ह्यात गेले पाच दिवस पावसाची संततधार सुरूच आहे. पावसामुळे अनेक ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. राजापूर शहरात बुधवारी पडलेल्या मुसळधार पावसामुळे शहरात पुराचे पाणी ओसरले आहे. जिल्ह्यात अनेक भागात पावसाची संततधार सुरूच असली तरी नद्यांची पाणी पातळी वाढलेली नाही.जिल्ह्यात गेल्या २४ तासात सरासरी ८९.०७ मिलीमीटर तर एकूण ८०१.६० मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात गेल्या २४ तासात मंडणगड १०२.१० मिलीमीटर, दापोली ८९.२० मिलीमीटर, खेड ७०.७० मिलीमीटर, गुहागर ९४.८० मिलीमीटर, चिपळूण ७०.४० मिलीमीटर, संगमेश्वर ६७.६० मिलीमीटर, रत्नागिरी ८६.५० मिलीमीटर, लांजा १२०.७० मिलीमीटर, राजापूर ९९.६० मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे.जिल्हा नियंत्रण कक्षाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार दापोली तालुक्यातील मौजे गरदे येथील दापोली ते गरदे चार रस्त्यावरील बाजूची दरड कोसळल्याने वाहतूक बंद झाली आहे. मौजे उजगाव येथील कृष्णा देवजी धोपट यांच्या घराचे अतिवृष्टीने १९,६०० रुपयांचे नुकसान झाले आहे. मौजे उजगाव येथील शंकर जानू गोरे यांच्या घराचे अतिवृष्टीने ८हजार रुपये व जनार्दन देवजी धोपट यांच्या घरामध्ये पावसाचे पाणी शिरल्याने अन्न, धान्य, कपडे व घराचे अंशत: २९,५०० रुपये नुकसान झाले आहे.गुहागर तालुक्यात मौजे वारदई गाव येथील कल्पना कृष्णा जोशी यांच्या घराचे पावसामुळे ३ लाख ५५ हजार रुपये नुकसान झाले आहे. संगमेश्वर मौजे ओझरखोल येथील चंद्रभागा सखाराम लिंगायत यांच्या घराचे पावसामुळे अंशत: २७,६०० रुपये नुकसान झाले आहे.

मौजे कोळंबे येथील विजय महादेव भरणकर यांच्या घराशेजारचा पावसामुळे बांध पडल्याने घराचे अंशत: १० हजार रुपये नुकसान झाले आहे. रत्नागिरी तालुक्यातील मौजे भंडारपुळे येथील शैलेश धोंडू सुर्वे यांच्या दोन म्हशी विजेच्या तारेचा शॉक लागून मृत झाल्या आहेत.वाहून गेलेल्या प्रौढाचा मृतदेह सापडलाराजापूर तालुक्यातील अर्जुना नदीच्या पुरात सोमवारी (१२ जुलै) वाहून गेलेल्या प्रौढाचा मृतदेह बुधवारी सायंकाळी पडवे - बाणेवाडी येथे आढळला. हा मृतदेह बेपत्ता सहदेव खेमाजी सोडये (४०, रा. सोडयेवाडी, राजापूर) यांचाच असल्याचे त्यांच्या कुटुंबीयांनी ओळखले असल्याची माहिती नाटे सागरी पोलीस स्थानकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आबासाहेब पाटील यांनी दिली. या पावसाळ्यात आलेल्या पुराने राजापुरात पहिला बळी घेतला आहे. 

टॅग्स :RainपाऊसRatnagiriरत्नागिरी