रत्नागिरी/सिंधुदुर्ग : क्यार वादळामुळे तळकोकणात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात ऐन दिवाळीतही पावसाने दणका दिला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही ठिकाणी वादळी वाऱ्याने दणका दिला आणि दोन्ही जिल्ह्यात वादळामुळे आलेल्या पावसाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडून टाकले.रत्नागिरी जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यापर्यंत ४,९११ मिलीमीटर इतका पाऊस पडला होता. मात्र आॅक्टोबर महिन्यात क्यार वादळामुळे पुन्हा पावसाचे आगमन झाले. वादळसदृश्य वाऱ्यांसह जिल्ह्यात १११ मिलीमीटर इतका पाऊस ऑक्टोबर महिन्यात नोंदला गेला आहे. आतापर्यंत आॅक्टोबर महिन्यात इतका पाऊस कधीही पडलेला नाही.हळवी भातशेती गणपती उत्सवादरम्यान केली जाते. मात्र तेव्हापासून पाऊस असल्याने ही कापणी झाली नाही. नंतरच्या टप्प्यातही गरवी आणि निमगरवी शेतीही वादळी पावसाच्या तडाख्यात सापडली आणि या पावसाने शेतीचे पूर्ण नुकसान केले.
वादळामुळे कोकणात आॅक्टोबरमध्येही पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2019 14:07 IST
क्यार वादळामुळे तळकोकणात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात ऐन दिवाळीतही पावसाने दणका दिला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही ठिकाणी वादळी वाऱ्याने दणका दिला आणि दोन्ही जिल्ह्यात वादळामुळे आलेल्या पावसाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडून टाकले.
वादळामुळे कोकणात आॅक्टोबरमध्येही पाऊस
ठळक मुद्देवादळामुळे कोकणात आॅक्टोबरमध्येही पाऊसपावसाने शेतीचे पूर्ण नुकसा