शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

Rain in Chiplun: चिपळुणात पावसाची मुसळधार! वाशिष्ठी, शिवनदीने गाठली इशारा पातळी

By संदीप बांद्रे | Updated: August 7, 2022 16:23 IST

Rain in Chiplun: गेल्या अनेक दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने रविवारी पहाटेपासून जोरदार हजेरी लावली.  मुसळधार पावसामुळे येथील वाशिष्ठी व शिवनदीनेही इशारा पातळी जवळजवळ गाठली आहे.

चिपळूण - गेल्या अनेक दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने रविवारी पहाटेपासून जोरदार हजेरी लावली.  मुसळधार पावसामुळे येथील वाशिष्ठी व शिवनदीनेही इशारा पातळी जवळजवळ गाठली आहे. प्रशासनाने पुन्हा एकदा आपत्ती व्यवस्थापनासह नगर परिषद नियंत्रण कक्षदेखील सज्ज केले आहे. दरम्यान, धोकादायक बनलेल्या परशुराम घाटातील वाहतूक दिवसा सुरुच ठेवली आहे.

मुसळधार पावसामुळे येथील वाशिष्टी व शिवनदी दुथडी भरून वाहत आहे. वाशिष्ठी नदीची समुद्र सापटीपासून ५ मीटर वर असलेली इशारा पातळी जवळजवळ गाठली आहे. बाजारपेठेतील बाजारपुल, नाईक कंपनी, भेंडीनाका, रंगोबा साबळे मार्ग, वडनाका, एकविरा देवी मंदिर, जुना कालभैरव मंदिर रस्ता या परिसरात पावसाचे पाणी  मोठ्या प्रमाणात साचले आहे. पहाटे पासून शहर आणि ग्रामीण भागात पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. धो-धो पाऊस पडल्याने शहरात अनेक ठिकाणी पाणी तुंबले. महामार्गावर डीबीजे महाविद्यालय, तसेच कापसाळ येथे पाणी तुंबले होते. याच पद्धतीने बाजारपेठेतील मुख्य व अंतर्गत रस्त्यांवर एक ते दीड फूट पाणी साचले आहे. या पाण्यातूनच वाहने काढली जात होती. सलग मुसळधार पाऊस कोसळल्याने नागरिकांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

गेल्या दहा दिवसांपासून विश्रांती घेतली होती. या दिवसांत ऊन पावसाचा खेळ सुरू होता. शुक्रवार, शनिवारी तर संपूर्ण दिवस चकाचक ऊन आणि मध्येच पावसाची हलकी सर असे वातावरण होते. परंतु रविवारी पहाटे पासून पावसाने जोरदार सुरुवात केली. काळाकुट्ट अंधार करत व वादळी वाऱ्यासह येथे धो-धो पाऊस पडू लागला. पावसाची तीव्रता क्षणाक्षणाला वाढत गेली. पावसाने अक्षरशः रौद्ररूप दाखवण्यास सुरुवात केल्याने व्यापाऱ्यांसह नागरिक देखील सतर्क झाले आहेत.

सध्या कोयना विद्युत प्रकल्पातील एक टर्बाइन सुरू आहे, अशी माहिती मुख्य अभियंता चोपडे यांनी दिली आहे. साधारण दोन तास वाट बघून ते टरबाइन बंद करण्यात येईल व संध्याकाळी जर पाऊस आटोक्यात असेल तर ते टर्बाइन बंदच राहील, असेही चोपडे यांनी सांगितले. कारण संध्याकाळी भरती असल्याने शक्यतो विसर्ग करण्यात येणार नाही. परंतु जर धरण क्षेत्रात पाऊस खूपच लागला, तर मात्र टर्बाइन चालू ठेवावा लागेल असेही माहिती त्यांनी दिली आहे. सध्या कोळकेवाडी धरण तुडुंब भरलेला असल्याने पाणी टर्बाईन्व्दारे सोडावे लागत आहे. नवजा व पोफळी परिसरात पाऊस खूप आहे, मात्र धरण क्षेत्रात कमी आहे. 

टॅग्स :RainपाऊसChiplunचिपळुणRatnagiriरत्नागिरी