शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

रायगडातील मुस्लिमांनी मला मराठीत कुराण दिले हेच आमचे हिंदुत्व : उद्धव ठाकरे

By मनोज मुळ्ये | Updated: February 5, 2024 13:56 IST

''‘त्यांची' चौकशी करुन दाखवा'

राजापूर : रायगडातील मुस्लिमांनी मला मराठीत कुराण दिले हेच आमचे हिंदुत्व आहे. त्यामुळे आमच्या हिंदुत्वावर कोणीही शंका घेऊ नये, असे सांगत माझे मोदींशी कोणत्याही प्रकारचे वैर नाही, ते मला मानत असतील तर त्यात माझा दोष नाही, असे प्रतिपादन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजापूर येथील सभेत बोलताना केले.राजापूर शहरातील जवाहर चौकात आज, साेमवारी सकाळी त्यांनी जनसंवाद सभा घेतली. यावेळी व्यासपीठावर रश्मी ठाकरे, खासदार विनायक राऊत, राजापूरचे आमदार राजन साळवी, कुडाळचे आमदार वैभव नाईक, माजी आमदार गणपत कदम व अन्य पदाधिकारी उपस्थित हाेते.ठाकरे पुढे म्हणाले की, संकट काळात राजन साळवींनी जी साथ दिली आहे, त्यामुळे मला राजन साळवींचा अभिमान आहे. राजन साळवींवर सध्या सुडाच्या राजकारणातून लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाची कारवाई सुरु आहे. त्याचा तपास करणारे अधिकारी सुशांत चव्हाण यांनी साळवी यांच्या घराची झडती घेतली. या झडतीनंतर सुशांत चव्हाण यांनी शिवाजी महाराजांच्या मूर्तीची किंमत पाच हजार केली आहे. कुणाची किंमत करताय तुम्ही, असा प्रश्न त्यांनी केला. तुमच्या सात पिढ्या संपल्या तरी याची किंमत तुम्ही फेड करु शकत नाही, असेही त्यांनी ठणकावले.

मी लढायला उभा आहे तो माझ्यासाठी नाही तर तुमच्यासाठी असेही ठाकरे यावेळी म्हणाले. जात, पात, धर्म सगळं विसरुन एकत्र येऊया व देशावरचे संकट दूर करुया. तरच आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज की जय असे म्हणण्याचा अधिकार राहिल, असे ठाकरे यांनी सांगितले.

‘त्यांची' चाैकशी करुन दाखवातुम्ही राजन साळवींवर कुणाची तरी तक्रार आली म्हणून कारवाई करत आहात. मग राजापुरात सध्या इच्छुक उमेदवार म्हणून जे पैसे खर्च करतायत त्यांची चौकशी करुन दाखवा, असे आव्हानही दिले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीUddhav Thackerayउद्धव ठाकरेRajapurराजापुर