बाैद्ध महासभेच्या संगमेश्वर तालुकाध्यक्षपदी राहुल माेहिते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:32 IST2021-03-27T04:32:49+5:302021-03-27T04:32:49+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क देवरुख : भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा संगमेश्वरच्या अध्यक्षपदी राहुल बळीराम मोहिते, सरचिटणीसपदी विजय शंकर मोहिते ...

Rahul is known as Sangameshwar taluka president of Baidh Mahasabha | बाैद्ध महासभेच्या संगमेश्वर तालुकाध्यक्षपदी राहुल माेहिते

बाैद्ध महासभेच्या संगमेश्वर तालुकाध्यक्षपदी राहुल माेहिते

लाेकमत न्यूज नेटवर्क

देवरुख : भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा संगमेश्वरच्या अध्यक्षपदी राहुल बळीराम मोहिते, सरचिटणीसपदी विजय शंकर मोहिते तर खजिनदारपदी मनोहर गंगाराम मोहिते यांनी निवड करण्यात आली आहे.

नूतन कार्यकारिणीची सभा देवरुख येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात पार पडली. या बैठकीला बौद्ध महासभेचे जिल्हा पालकमंत्री ज. भा. कदम, जिल्हाध्यक्ष अनंत सावंत, सरचिटणीस एन. बी. कदम, संस्कार विभागाचे जिल्हा सचिव अ. जा. मोहिते, जिल्हा संघटक विजय जाधव, समता सैनिक दलाचे शरणपाल कदम उपस्थित होते. सभेच्या अध्यक्षस्थानी महेंद्र जाधव हे होते.

त्याबरोबरच हिशोब तपासणीस म्हणून वाय. जी. पवार, कार्यालयीन सचिव अमर अनंत पवार तसेच महिला विभागाच्या उपाध्यक्षपदी रसिका मनोहर मोहिते, सचिव म्हणून सुषमा राजेंद्र मोहिते आणि विशाखा विलास कदम यांची निवड करण्यात आली. यावेळी ज. भा. कदम, अनंत सावंत व अन्य जिल्हा पदाधिकारी यांनी नूतन कार्यकारिणीला मार्गदर्शन केले.

Web Title: Rahul is known as Sangameshwar taluka president of Baidh Mahasabha