शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
4
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
5
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
6
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
7
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
8
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
9
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
10
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
11
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
12
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
13
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
14
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
15
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
16
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
17
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
18
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
19
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
20
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
Daily Top 2Weekly Top 5

‘रघुवीर’ला मोठी पसंती

By admin | Updated: August 31, 2014 00:35 IST

पर्यटकांची भेट : धबधबे, लाल खेकडे खास आकर्षण

सुभाष कदम ल्ल चिपळूणखेड तालुक्यातील खोपी शिरगावच्या डोंगर माथ्यावर रघुवीर घाट दिमाखात उभा आहे. रत्नागिरी व सातारा जिल्ह्याच्या सीमारेषेवर असलेला हा रखवालदार पर्यटकांची खास आकर्षण आहे. मौजमज्जा करण्यासाठी व निसर्गाचा मनमुराद आस्वाद लुटण्यासाठी एकदा तरी रघुवीर घाटात जायला हवेच. एका बाजूला कोयना खोरे, घनदाट जंगल तर दुसऱ्या बाजूला डोंगरउतार असलेल्या रघुवीर घाटाचा काही भाग सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात समाविष्ट झाला आहे. त्यामुळे या घाटाचे आणखी महत्त्व वाढले आहे. पश्चिम घाटात समाविष्ट असलेल्या सह्याद्रीमध्ये अनेक औषधी वनस्पती व विविध प्रकारची जैवविविधता आहे. येथील घाटात फिरताना त्याची प्रचिती येते. उंचच उंच कडे, त्यावर पडणारे धुके आणि आकाशाला गवसणी घालणारे ढग, हिरवाईने नेटलेले डोंगर काळ्याकभिन्न कड्याकपाऱ्या पाहिल्यावर आपण स्वर्गात तर नाही ना, असा भास होतो. निसर्ग सौंदर्याचे अनोखे दर्शन येथे घडते. समुद्रसपाटीपासून ७६० मीटर उंची असलेल्या रघुवीर घाटाची रत्नागिरी जिल्ह्यातील लांबी ११ हजार ५०० किलोमीटर आहे. खोपी, शिंदी, वळवण, बामणोलीमार्गे तापोळाकडून फेरीबोटीने पर्यटकांना महाबळेश्वरला जाता येते. महाबळेश्वरला जाण्यासाठी हा एक चांगला मार्ग आहे. निसर्ग पर्यटन करताना विविध प्रकारचे पक्षी, त्यांचे आवाज, विविध प्रकारचे लहान-मोठे प्राणी, सरपटणारे प्राणी, वाऱ्याचा सळसळणारा आवाज कानात घुमत असतो. हे सारेच अद्भूत आणि मनाला संजीवनी देणारे वाटते. येथे लाल रंगाच्या खेकड्यांना राजू म्हणतात. हे छोटे छोटे चिटुकले राजू पकडताना विलक्षण मजा येते. रघुवीर घाटात अनेक लहान मोठे धबधबे उंच कड्यावरुन उड्या घेत असतात. पांढऱ्या शुभ्र दुधाच्या धारा अंगावर पडाव्यात, तसे धबधब्याचे पाणी पडत असते. त्याचे तुषार अंगावर उडाले की मन मोहरुन जाते. रघुवीर घाटात असे लहान मोठे अनेक धबधबे लक्ष वेधून घेतात आणि भिजल्याशिवाय राहवत नाही. पाण्यात चिंबचिंब भिजताना अनोखा आनंद मिळतो.घाटात वाहन चालवितानाही पुरेशी काळजी घ्यावी लागते. अनेकवेळा रस्त्यावर दरड येते किंवा झाडे कोसळलेली असतात. त्यामुळे सतर्क राहणे गरजेचे असते. स्वच्छ, सुंदर व निसर्गाचा निखळ आनंद लुटतानाच मनोरंजनासाठी एकदा तरी रघुवीर घाटाला भेट द्यायलाच हवी. विहंगम अन् विलोभनीय...हिरवाईने नटलेल्या डोंगरावर विविध रंगी पशुपक्षी.माकडापासून मात्र सावधान.काळ्या कातळावर घडते लाल खेकड्यांचे दर्शनडोंगर, दऱ्यातून घोंगावणारा वाऱ्याचा आवाज ह्रदयात धडकी भरतो डोंगर पायथ्याशी असलेला जलसाठ्याने खुलते सौंदर्य.