शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

चिपळुणात बाजारपेठेत दोन गटात राडा, तरुणांनी व्यापाऱ्याला रॉडने केली मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2018 13:59 IST

चिपळूण शहरातील बाजारपेठेत जुना स्टॅण्ड परिसरात अलिशान चारचाकी गाडीतून येवून चौघांनी चिपळुणातील एका व्यापाऱ्याला दुकानातून बाहेर बोलवून भर रस्त्यात मारहाण करायला सुरुवात केली.

ठळक मुद्देचिपळुणात बाजारपेठेत दोन गटात राडा, तरुणांनी व्यापाऱ्याला रॉडने केली मारहाण व्यापाऱ्यांला बेदम मारुन गाडीची केली तोडफोड

चिपळूण : शहरातील बाजारपेठेत जुना स्टॅण्ड परिसरात अलिशान चारचाकी गाडीतून येवून चौघांनी चिपळुणातील एका व्यापाऱ्याला दुकानातून बाहेर बोलवून भर रस्त्यात मारहाण करायला सुरुवात केली. हा प्रकार समजल्यानंतर व्यापाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेवून त्या चौघांनी बेदम धुलाई करुन गाडीची तोडफोड केली. यामध्ये तिघे जण जखमी झाले आहेत.

 या ठिकाणी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. सायंकाळी उशीरापर्यंत गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु होती. या प्रकरणातील एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या मारहाणीेचे कारण समजू शकलेले नाही.घटनास्थळावरुन मिळालेल्या माहितीनुसार अमित अनंत शिर्के, राकेश चव्हाण, प्रविण वासुदेव घुळे, किरण चव्हाण हे चौघेजण पांढऱ्या रंगाच्या अलिशान चारचाकी गाडीतून (क्र. एम एच ११ ए डब्ल्यु ८२१८) बाजारपेठेत आले. स्वामी कॉम्प्लेक्सच्या बाहेर फळविक्रीचा व्यवसाय करणारे नयन पिसे यांना त्यांनी दुकानातून बाहेर बोलवून घेतले.नयन रस्त्यावर आल्यानंतर त्याला चौघांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यावेळी त्याचे वडिल शिवाजी पिसे सोडविण्यासाठी गेल्यानंतर त्यांनाही मारहाण करायला सुरुवात केली. त्यांच्या दुकानाचीही नासधूस केली.

हा प्रकार समजल्यानंतर शहरातील व्यापारी घटनास्थळी धावून आले. त्यांनी चौघांची धुलाई केली. त्यांच्याकडे मारामारीसाठी वापरणारे प्लास्टिक रॉड सापडले. जमलेल्या जमावाने गाडीच्या काचा फोडून गाडीची नासधूस केली.या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ सहकाऱ्यांना घेवून घटनास्थळी दाखल झाले. पोलीस घटनास्थळी पोहचल्यानंतर जमाव बाजूला झाला. जखमी अनंत शिर्के, राकेश चव्हाण व वासुदेव घुळे यांना शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

किरण चव्हाण तेथून पसार झाला. पोलिसांनी मारामारीसाठी वापरलेले रॉड व गाडी जप्त केल्यानंतर दोन्ही बाजूचे लोक फिर्याद देण्यासाठी पोलीस ठाण्यात दाखल झाले होते. सायंकाळी उशीरापर्यंत गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरु होती. या प्रकरणी पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRatnagiriरत्नागिरी