शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

चिपळुणातील राडा म्हणजे भास्कर जाधव यांचा पूर्वनियोजित कट, केदार साठे यांचा आरोप

By संदीप बांद्रे | Updated: February 20, 2024 17:47 IST

आमदार भास्कर जाधव यांनी पत्रकार परिषदेत राणे समर्थकांनी राडा करीत हल्ला केल्याचा आरोप केला होता.

चिपळूण : माजी खासदार निलेश राणे यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभुमीवर १६ फेब्रुवारीस पोलिसांनी आमदार भास्कर जाधव यांच्या कार्यालयास मोठा पोलिस बंदोबस्त ठेवला होता. मात्र तरीही येथे घडलेली घटना फक्त राजकीय राडा इथपर्यंत मर्यादित नसून निलेश राणेंसह भाजप कार्यकर्त्यांवर त्यांना हल्ला करायचाच होता. त्यासाठी कट रचून कार्यकर्त्याची कुमक जमवली. त्याच्या कार्यालय परिसरात कार्यकर्त्याजवळ लोखंडी शिगा व दगड असल्याचे व्हिडीओ सापडले आहे. जाधवांच्या पायाखालची वाळू सरकल्याने त्यांनी हत्यारे गोळा करीत प्राणघातक हल्ला केल्याचा आरोप भाजपाचे उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष केदार साठे यांनी पत्रकार परिषदेत केला.

आमदार भास्कर जाधव यांनी पत्रकार परिषदेत राणे समर्थकांनी राडा करीत हल्ला केल्याचा आरोप केला होता. त्यावर भाजप जिल्हाध्यक्ष केदार साठे म्हणाले की, आमदार जाधव यांनी सिंधुदुर्गातील सभेत राणे कुंटुबियांवर व्यक्तीगत टीका केल्यानंतर निलेश राणेंनी गुहागरात जाहीर सभा घेण्याचे जाहीर केले होते. राणेंचे चिपळूणात कोठे स्वागत होईल याची माहिती व ठिकाण पोलिसांना सांगितले होते. राणेंच्या दौऱ्यानिमीत्ताने जाधवांच्या संपर्क कार्यालयास पोलिस संरक्षण होते. तरिही आमदार जाधव यांनी कार्यकर्त्याना बोलावून घेत जमा करीत शक्तीप्रदर्शन केले. राणेंची मिरवणूक सुरू झाल्यानंतर जाधवांच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या मागे उभे राहून दगडफेक केली. त्यांच्या कार्यालय आवारात लोखंडी शिगा व दगड असलेले व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. कार्यालयाच्या आवारात हत्यारे गोळा करण्याचा हेतू काय, याची वरिष्ठ स्तरावून चौकशी करण्याची मागणी आम्ही केलेली आहे.

गुहागर मतदार संघातून आमदार जाधवांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे. त्यामुळे वैफल्यग्रस्त भावनेतून त्यांनी निलेश राणेंवर हल्ला करण्याचा कट रचला. हा कट पुर्व नियोजीत होती. जाधवांच्या कार्यालय आवारातील इमारतींच्या टेरेसवर देखील दगडाचा साठा होता. मिरवणूकी दरम्यान संघर्ष निर्माण होण्यासाठी आमदार जाधव हे त्यांच्या कार्यकर्त्याना चिथावणी देत होते. त्यांचे हावभाव आणि हालचाली देखील चित्रीकरणात दिसतात. त्यामुळे १६ रोजी झालेल्या या हल्ल्याच्या मुळाशी जाऊन तपास करण्याची मागणी आम्ही ग्रहमंत्र्यांकडे केली आहे, असे साठे यांनी मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. यावेळी माजी नगरसेवक विजय चितळे, परिमल भोसले, तालुकाध्यक्ष वसंत ताम्हणकर आदी उपस्थित होते.

टॅग्स :Bhaskar Jadhavभास्कर जाधवChiplunचिपळुण