शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor: कुख्यात दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबाचा खात्मा; १४ लोकांना यमसदनी धाडलं
2
आजोबा, वडील एक्स आर्मी... पतीही मेजर! कोण आहेत लेफ्टनंट कर्नल सोफिया कुरेशी...
3
Operation Sindoor: २५ मिनिटांत ९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त; कर्नल सोफिया कुरैशी यांनी सांगितला थरार
4
Operation Sindoor : पाकिस्तानमध्ये हल्ल्याच्या २३ मिनिटे आधीच लष्कराने ट्विट केले? समोर आली माहिती
5
‘ऑपरेशन सिंदूर’चे श्रेय तुम्ही घेऊ नका, ते फक्त भारतीय सेनेचेच; संजय राऊतांची सरकारवर टीका
6
'ऑपरेशन सिंदूर'चा परिणाम! 'या' डिफेन्स स्टॉक्सने घेतली मोठी झेप; ३ महिन्यात नफा दुप्पट
7
Operation Sindoor: पाकिस्तान पिसाळला, शस्त्रसंधीचं उल्लंघन करत उखळी तोफा डागल्या, ७ भारतीयांचा मृत्यू
8
गृह मंत्रालय अलर्ट! निमलष्करी दलांच्या सुट्ट्या रद्द; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर भारत-पाकमधील तणाव वाढला
9
पाकिस्तानी स्टॉक मार्केटचे काय हाल ऐकाल...; रात्री भारताची मिसाईल कोसळली, दिवसा भीतीने शेअर बाजार...
10
"आता ज्यांच्या पोटात दुखेल त्यांनी थेट माझा देश सोडून जावं", मराठी अभिनेत्रीची पोस्ट व्हायरल
11
Operation Sindoor Live Updates: "यापुढेही भारतावर हल्ल्याची शक्यता, म्हणून उत्तर देणे गरजेचे होते"
12
“भारताला स्वसंरक्षणाचा अधिकार, दहशतवाद्यांना...”; ‘ऑपरेशन सिंदूर’चे इस्रायलकडून खुले समर्थन
13
Operation Sindoor : 'ऑपरेशन सिंदूर'च नव्हे, भारताने आधीही पाकिस्तानविरुद्ध केलेल्या 'या' मोठ्या कारवाया!
14
Operation Sindoor: 'सिंधू ते सिंदूर'पर्यंत...! भारताच्या 'या' १५ पावलांनी पाकिस्तानच्या नाकीनऊ आणले
15
FD/RD/PPF सगळं विसराल, SIP मध्ये लपलाय खरा खजिना; ₹५००० ची गुंतवणूक कशी बनवेल तुम्हाला कोट्यधीश
16
Vastu Shastra: हिरव्या रंगाचे पायपुसणे दारात ठेवा, यश, कीर्ती, भाग्योदयाचा ग्रीन सिग्नल मिळवा!
17
Operation Sindoor : भारतीय सैन्याने दहशतवाद्यांचा रात्रीत खात्मा केला; पाकिस्तानमधील हल्ल्याचे फोटो आले समोर
18
“भारताने केलेली लष्करी कारवाई खेदजनक, दहशतवादाला विरोध पण...”; ‘ऑपरेशन सिंदूर’वर चीनचे भाष्य
19
Operation Sindoor : पाकिस्तानवर हवाई हल्ला करताच पुण्यातून लढाऊ विमाने झेपावली; मुंबईपर्यंत दिले संरक्षण...
20
ज्येष्ठ रंगकर्मी माधव वझे यांचं निधन; 'श्यामची आई', '३ इडियट्स' सिनेमांमध्ये केलं होतं काम

धरणांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

By admin | Updated: March 18, 2016 23:43 IST

उपाययोजनांची गरज : राजापूर तालुक्यातील माय-लेकीच्या मृत्यूनंतर धोका कायम

राजापूर : ओझर धरणावर पाणी आणण्यासाठी गेलेल्या माय-लेकींचा पाय घसरल्याने पाण्यात पडून मुत्यू झाल्यानंतर राजापूर तालुक्यातील अनेक उघड्या धरणांचा प्रश्न पुढे आला आहे. याबाबत शासन या उघड्या धरणांबाबत कोणती उपाययोजना करणार? असा सवाल जनसामान्यांतून विचारला जात आहे.राजापूर तालुक्यात सुमारे पंधरा ते वीस धरण प्रकल्प असून, काही पूर्ण तर काही अपूर्ण आहेत. मात्र, यापैकी एकाही प्रकल्पाला बंदिस्त करण्यात आलेले नाही. हे सर्व धरण प्रकल्प उघडेच आहेत. त्यामुळे तेथे कुणीही कधीही व केव्हाही जाते हे अनेकदा दिसुन आले आहे. अशा उघड्या धरणांमुळे सुरक्षितताच धोक्यात आली आहे.पाणीटंचाईच्या काळात जेथे अशी धरणे आहेत तेथे पाणी भरण्यासाठी आजूबाजूच्या परिसरातील ग्रामस्थ पाण्यासाठी याठिकाणी येतात. अशावेळी कोणताही विचार न करता सरळ हे ग्रामस्थ धरणात उतरतात. यापूर्वी तालुक्यात धरणात पडून मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र, तरीही याबाबत संबंधित विभागाने कोणतीही उपाययोजना न केल्यामुळे आणखी दोघांना जीव गमवावा लागला आहे. राजापूर तालुक्यात असे एकही धरण नाही की जे पूर्ण बंदीस्त आहे. याबाबत शासनाचे नक्की धोरण काय हे देखील स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे अशी धरणे उघडी ठेवायची का? जर ती उघडी ठेवायची असतील, तर तेथील सुरक्षिततेची हमी कोण देणार? याचे उत्तर आता जनतेला मिळणे आवश्यक आहे. या धरणांतील जॅकवेल पूर्णंत: उघड्या असून, त्या बंदिस्त करणे आवश्यक आहे. काही प्रकल्प बांधून वीस ते पंचवीस वर्षापेक्षा अधिक कालावधी लोटला आहे. त्यामुळे तेथील लोखंडी साहित्य व पत्रे गंजून गेले आहेत. अशा धरणांवर पाटबंधारे विभागाने आपला कर्मचारीही ठेवलेला नाही. केवळ माणसेच नाहीत तर पाळीव जनावरेही अशा उघड्या धरणांवर पाणी पिण्यासाठी जातात. तालुक्यातील एकाही धरणातून कालवे काढण्यात न आल्याने ज्या प्रमाणात येथील क्षेत्र सिंंचनाखाली यायला हवे होते ते अद्याप आलेले नाही. काहीवेळा तर पिण्यासाठीही पाणी मिळत नाही. पण धरणात साठणारा तुडुंब पाणीसाठा एक तर तसाच शिल्लक राहतो किंंवा उन्हाळ्यात सोडून दिला जातो. राजापूर तालुक्यातील माणसे पाण्याअभावी नाहीत तर पाण्यात बुडून मृत्यूमुखी पडत आहेत, हेच धक्कादायक चित्र पहावयास मिळत आहे. ओझरच्या घटनेनंतर शासन अशी सर्व धरणे बंदिस्त करणार का? हाच खरा सवाल आहे. (प्रतिनिधी)ओझर परिसरच सुन्न : माय-लेकीवर एकाचवेळी अंत्यसंस्कारओझर धरणात बुडून मृत्यूमुखी पडलेल्या माय-लेकीवर गुरुवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. एकाचवेळी माय-लेकीवर झालेल्या अंत्यसंस्काराने संपूर्ण ओझर परिसरातील ग्रामस्थांत दु:खाचे वातावरण होते. ओझर धरणात बुडून मृत्यू पावलेल्या गावातील मनिषा महादेव कोकरे व त्यांची मुलगी संगिता या आपल्या घरापासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर असलेल्या ओझर धरणावर पाणी भरण्यासाठी गेल्या होत्या. यापूर्वीही कोकरे कुटुंबातील माणसे त्या धरणावर पाणी भरण्यासाठी जात असत. मात्र, बुधवार हा त्यांच्यासाठी घातवार ठरला व धरणातून पाणी भरताना पाय घसरलेल्या आपल्या मुलीला वाचवताना आईला देखील आपले प्राण गमवावे लागले. बुधवारी रात्रीच दोन्ही मृतदेहांचे शवविच्ेदन करण्यात येऊन ते नातेवाईकांच्या ताब्यात दण्यात आले. गुरुवारी त्या मृतदेहांवर एकाचवेळी अंतिम संस्कार करण्यात आले. धरण प्रकल्पतालुक्यात धरण प्रकल्पांची कामे सुरू आहेत. सुमोर १५ ते २० धरण प्रकल्पांचे काम करण्यात आले आहेत. यातील काही प्रकल्प पूर्ण झाले आहेत. तर काही अद्यापही अपूर्णावस्थेत आहेत. याठिकाणी अपघातांचा धोका कायम आहे.