शहरं
Join us  
Trending Stories
1
एखाद्याला खूश करण्यासाठी मुलांचे भविष्य खराब करू नका, हिंदी सक्तीवरून सुप्रिया सुळे भडकल्या!
2
Shefali Jariwala Death: शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
3
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, आज 'या' राशीतील लोकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक
4
झटपट पैसे कमावण्यासाठी पती-पत्नीने सुरू केला असा धंदा, अश्लील चॅट, व्हिडीओ आणि...
5
Philippines Earthquake: फिलीपिन्समध्ये ६.० तीव्रतेचा भूकंप, नागरिकांमध्ये घबराट!
6
आता मोबाइल ॲपद्वारे कुठूनही करता येणार मतदान; कोणत्या मतदारांना मिळणार अधिकार?
7
Shefali Jariwala: शेफाली जरीवालाच्या शेवटच्या एक्स पोस्टमध्ये 'या' व्यक्तीच्या नावाचा उल्लेख!
8
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?
9
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
10
तरुण जोडप्यांना मुलांची आस, पण तरीही का घसरतोय देशाचा प्रजनन दर?
11
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
12
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
13
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
14
विशेष लेख: इंदिरा गांधी यांच्या जागी दुसरे कुणी असते तरीही...
15
जुलैमध्ये १३ दिवस बँका राहणार बंद; राज्यनिहाय वेगळ्या सुट्ट्या, महाराष्ट्रात किती दिवस राहणार बंद?
16
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
17
अग्रलेख: अंतराळात भारतीय शुभकिरण! भारताचे स्वप्न पूर्ण होण्याचा क्षण
18
लेख: तुमच्या घरातला एसी आता ‘फार’ थंड नाही होणार!
19
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
20
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू

कोरोना काळात सव्वातीन लाख नवीन वीजजोडण्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:21 IST

रत्नागिरी : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत वीज पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी युध्दपातळीवर कार्यरत राहून महावितरणने सव्वातीन लाख नवीन वीजजाेडण्या कार्यान्वित ...

रत्नागिरी : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत वीज पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी युध्दपातळीवर कार्यरत राहून महावितरणने सव्वातीन लाख नवीन वीजजाेडण्या कार्यान्वित केल्या आहेत. मार्च महिन्यात ६६,३१०, एप्रिलमध्ये १,४४,६५१ व मे मध्ये १,०३,४४८ अशा उच्च व लघुदाबाच्या तब्बल ३ लाख १४ हजार ४०९ नवीन वीजजोडण्या कार्यान्वित केल्या आहेत.

गतवर्षी लॉकडाऊनमुळे वीजमीटरचा तुटवडा निर्माण झाला होता. महावितरणने पुरवठादारांना सिंगल फेजचे १८ लाख तर थ्री फेजचे १ लाख ७० हजार नवीन वीजमीटरच्या पुरवठ्याचे आदेश दिले आहेत. त्याप्रमाणे आतापर्यंत सिंगल व थ्रीफेजचे ९ लाख ५३ हजार नवीन वीजमीटर उपलब्ध झाले असून, ते पुणे, नागपूर, औरंगाबाद व कल्याण प्रादेशिक कार्यालयांना पाठविण्यात आले आहेत.

महावितरणचे अभियंता व कर्मचारी कोरोना काळात युध्दपातळीवर कार्यरत आहेत. तसेच तातडीच्या आवश्यकतेनुसार ऑक्सिजन प्लांट, नवीन कोविड रुग्णालये, विलगीकरण कक्ष, लसीकरण केद्रांना केवळ २४ ते ४८ तासांत नवीन वीजजोडणी किंवा वाढीव वीजभार देण्यात आला. कोरोनाचे नियम पाळून दैनंदिन ग्राहकसेवा सुरु ठेवण्यात आली आहे.

मार्च, एप्रिल व मे या तीन महिन्यांच्या कालावधीत उच्चदाब वर्गवारीमध्ये औद्योगिक १७९, वाणिज्यिक २४, कृषी ७ आणि इतर ४० अशा एकूण २५० नवीन वीजजोडण्या तर लघुदाब वर्गवारीमध्ये घरगुती २ लाख ३३ हजार ४२७, वाणिज्यिक ३८ हजार २४, औद्योगिक ६,६५०, कृषी ३१ हजार ४७५, सार्वजनिक पाणी पुरवठा योजना ३८३ व इतर ४,२०० अशा एकूण ३ लाख १४ हजार १५९ नवीन वीजजोडण्या कार्यान्वित केल्या आहेत.

महावितरणने सिंगल व थ्री फेजच्या १९ लाख ७० हजार नवीन वीजमीटरचा पुरवठा करण्याच्या सूचना फेब्रुवारीमध्ये दिल्या होत्या. त्यामुळे नवीन वीजमीटरचा पुरवठा सुरळीत झाला आहे. आतापर्यंत सिंगल फेजचे ८ लाख ६८ हजार आणि थ्री फेजचे ८५ हजार मीटर उपलब्ध झाले असून, ते प्रादेशिक कार्यालयांना पाठविण्यात आले आहेत. कोकण प्रादेशिक कार्यालयाला सिंगल फेज ३ लाख २४ हजार व थ्री फेजचे २५ हजार ७८७ नवीन वीजमीटर देण्यात आले आहेत.