शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

कडधान्ये, गळीत धान्यासाठी प्रयत्न, यावर्षी बदलत्या वातावरणाचा पिकाला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2019 16:37 IST

यावर्षी झालेला अवकाळी पाऊस, अतिवृष्टी, त्यातच भर पडली ती क्यार वादळाची. त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. खरिपातील मुख्य असलेल्या भातपिकाचे मोठे नुकसान झाले. या नुकसानातून शेतकऱ्यांना सावरण्यासाठी चालू रब्बी हंगामामध्ये हरभरा, कुळीथ यासारखी कडधान्य पिके व भुईमूग, मोहरीसारखी गळीतधान्य पिके घेऊन शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करण्याचा दृष्टीने तालुका कृषी विभाग सरसावला असून, शेतकºयांना त्यासाठी मोफत बियाणे दिले जात आहे.

ठळक मुद्देलांजा तालुका कृषी विभाग शेतकऱ्यांच्या सहकार्यासाठी सरसावलारब्बी हंगामात उत्पन्नात वाढ होण्यासाठी कृषी विभागाचे प्रयत्न

अनिल कासारे लांजा : यावर्षी झालेला अवकाळी पाऊस, अतिवृष्टी, त्यातच भर पडली ती क्यार वादळाची. त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. खरिपातील मुख्य असलेल्या भातपिकाचे मोठे नुकसान झाले. या नुकसानातून शेतकऱ्यांना सावरण्यासाठी चालू रब्बी हंगामामध्ये हरभरा, कुळीथ यासारखी कडधान्य पिके व भुईमूग, मोहरीसारखी गळीतधान्य पिके घेऊन शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करण्याचा दृष्टीने तालुका कृषी विभाग सरसावला असून, शेतकऱ्यांना त्यासाठी मोफत बियाणे दिले जात आहे.कोकणातील शेतकऱ्यांचे पावसाळ्यातील मुख्य पीक म्हणजे भात आहे. पावसाने वेळेवर व समाधानकारक साथ दिली तर शेतकरी आपल्या शेतातून भात पिकाच्या रूपाने सोनं पिकवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करू शकतो. मात्र, यावर्षी उशिरापर्यंत पडलेला पाऊस व त्यानंतर झालेली अतिवृष्टी, त्यातून शिल्लक राहिलेली भातशेती ऐन कापणीच्या वेळी क्यार वादळ, अवकाळी पाऊस यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडातुन घास हिसकावला गेला आणि शेतकरी गर्भगळीत झाला. मायबाप सरकार नुकसान भरपाई कधी देणार, याकडे कोकणातील शेतकऱ्यांचे आता लक्ष लागून राहिले आहे.वातावरणात सातत्याने होणाऱ्या बदलांचा कोकणातील आंबा, काजू पिकाला नेहमीच फटका बसतो. या भयावह परिस्थितीवर मात करून शेतकऱ्यांला दिलासा देण्याच्या दृष्टीने लांजा कृषी विभागाने एक पाऊल पुढे टाकत रब्बी हंगामातील पिके घेण्याच्या दृष्टीने हरभरा, कुळीथ, तसेच गळीत पिके घेण्यासाठी भुईमूग, मोहरी यासारखी पिके घेण्यासाठी शेतकऱ्यांची मानसिकता बनवून त्यांना त्यासाठीचे मोफत बियाणे दिले आहे. भातपिकाच्या काढणीनंतर अगदी अंग ओलितावर सुध्दा हरभरा उत्पादन घेता येते. यातून अधिक उत्पन्न कसे मिळवता येईल, यासाठी कृषी विभाग प्रयत्नशील आहे.तालुका कृषी विभागाने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी उचललेले हे पाऊस कौतुकास्पद आहे. शेतकऱ्यांनीही या उपक्रमाला भरभरून साथ दिली आहे. सुमारे ३५ गावामधील शेतकरी यात सहभागी झाले असून, जवळपास २० हेक्टर क्षेत्रावर हरभरा, ३० हेक्टर क्षेत्रावर भुईमूग, १० हेक्टर क्षेत्रावर मोहरी लागवड करण्यात येणार आहे.

या पिकांबाबत प्रात्यक्षिकेही घेण्यात आली आहेत. लांजा तालुक्यातील शेतकऱ्यांना एकूण १४ क्विंटल हरभरा, ३० क्विंटल भुईमूग व २० किलो मोहरी बियाण्याचे मोफत वाटप करण्यात आले आहे. कृषी विभागाच्या या उपक्रमामुळे शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे.

लांजा तालुक्यातील ३५ गावातील शेतकऱ्यांनी या लागवडीचा फायदा घेतला आहे. यासाठी उपविभागीय कृषी अधिकारी गुरूदत्त काळे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील कृषी विभागाचे सर्व अधिकारी, कृषी सहाय्यक यांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग घेताना शेतकऱ्यांचा फायदा कसा होईल, याकडे विशेष लक्ष दिले आहे.शेतकऱ्यांसाठी मोफत बियाणेबदलत्या वातावरणाचा फटका कोकणातील खरीप पिकाला बसला आहे. शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्या दृष्टीने लांजा कृषी विभागाने एक पाऊल पुढे टाकत रब्बी हंगामातील पिके घेण्याच्या दृष्टीने हरभरा, कुळीथ तसेच गळीत पिके घेण्यासाठी भुईमूग, मोहरी यासारखी पिके घेण्यासाठी शेतकऱ्यांची मानसिकता बनवून त्यांना यासाठी मोफत बियाणे दिले आहे. 

टॅग्स :FarmerशेतकरीRatnagiriरत्नागिरी