शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

रखडलेल्या चौपदरीकरणाबाबत जनहित याचिका, २४ रोजी सुनावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2020 19:04 IST

highway, road, pwd, ratnagirinews मुंबई - गोवा महामार्गावरील आरवली ते वाकेड या ९१ किलोमीटर रस्त्याच्या रखडलेल्या चौपदरीकरणाबाबत संगमेश्वर येथील सामाजिक कार्यकर्ते संतोष येडगे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर २४ नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे.

ठळक मुद्देरखडलेल्या चौपदरीकरणाबाबत जनहित याचिका, २४ रोजी सुनावणी

रत्नागिरी : मुंबई - गोवा महामार्गावरील आरवली ते वाकेड या ९१ किलोमीटर रस्त्याच्या रखडलेल्या चौपदरीकरणाबाबत संगमेश्वर येथील सामाजिक कार्यकर्ते संतोष येडगे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर २४ नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे.१३ नोव्हेंबर २०१९ रोजी महामार्ग चौपदरीकरणाचे काम पूर्ण करावे, असा निविदा करार आहे. संबंधित ठेकेदाराने विहीत मुदतीत काम न केल्याने स्थानिक जनतेत प्रचंड असंतोष आहे. काम वेळेत व्हावे, यासाठी गेली दोन वर्षे संतोष येडगे यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या मुख्य अभियंत्यांची अनेकदा भेट घेऊन चर्चा केली. त्यासंदर्भात निवेदनही देण्यात आले. राष्ट्रीय महामार्ग विभाग कार्यकारी अभियंता यांच्या स्तरावरुन मुख्य अभियंता आणि वरिष्ठ पातळीवर रखडलेल्या कामासंदर्भात अनेकवेळा तक्रारी करण्यात आल्या.. मात्र कामात कोणताही फरक झालेला नाही.मुंबई - गोवा महामार्ग आरवली ते वाकेड या ९१ किलोमीटरमधील आरवली ते कांटे दरम्यान ४ टक्के आणि कांटे ते वाकेड दरम्यान फक्त ९ टक्के काम झाले असल्याचे राष्ट्रीय महामार्ग विभागाने स्पष्ट केले आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने चौपदरीकरणाच्या देखरेखीसाठी नवीन मनुष्यबळ घेण्याऐवजी ती जबाबदारी खासगी संस्थांवर दिली आहे.

साई आणि आर्वी अशा दोन संस्थांवर ही जबाबदारी आहे. मात्र, आरवली ते वाकेड या रखडलेल्या कामाबाबत या संस्थांची भूमिका काय आहे, याबाबत प्रश्नचिन्हच आहे. येडगे यांच्यावतीने ॲड. जयश्री बोडेकर - झोरे यांनी २२ ऑक्टोबर रोजी मुंबई उच्च न्यायालयात जनहीत याचिका दाखल केली असून, २४ नोव्हेंबर रोजी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.तक्रारीकडे दुर्लक्षमहामार्ग वेळेत पूर्ण व्हावा, यासाठी संतोष येडगे यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे अनेकवेळा तक्रारी केल्या. निवेदने दिली. मात्र, संबंधित विभागाने या तक्रारींकडे दुर्लक्ष केल्यामुळे येडगे यांनी न्यायालय गाठले आहे.

टॅग्स :highwayमहामार्गroad transportरस्ते वाहतूकpwdसार्वजनिक बांधकाम विभागRatnagiriरत्नागिरी