शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी : पोस्को अंतर्गत प्राचार्याला तीन वर्षे कारावास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2018 18:21 IST

प्राचार्य म्हणून काम करणाऱ्या पुरकान इस्माईल कुमठे यांना पोस्को अंतर्गत दाखल असलेल्या गुन्ह्यात तीन वर्ष साधा कारावास व विविध कलमांतर्गत १८ हजार पाचशे रुपये दंड अशी शिक्षा येथील जिल्हा अतिरिक्त व सत्र न्यायाधीश ए. एस. आवटे यांनी मंगळवारी सुनावली.

ठळक मुद्देपोस्को अंतर्गत प्राचार्याला तीन वर्षे कारावाससरकार पक्षातर्फे आठ साक्षीदार तपासण्यात आले

खेड : चिपळूण तालुक्यातील मुरादपुर येथील ए. ई. कालसेकर जुनियर कॉलेजमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत असलेला व आता सोलापूर येथे नामांकित महाविद्यालयात प्राचार्य म्हणून काम करणाऱ्या पुरकान इस्माईल कुमठे यांना पोस्को अंतर्गत दाखल असलेल्या गुन्ह्यात तीन वर्ष साधा कारावास व विविध कलमांतर्गत १८ हजार पाचशे रुपये दंड अशी शिक्षा येथील जिल्हा अतिरिक्त व सत्र न्यायाधीश ए. एस. आवटे यांनी मंगळवारी सुनावली.ही घटना २२ आॅक्टोबर २०१३ रोजी संशयित आरोपी कुमठे याच्या घरी दुपारी ३ च्या सुमारास घडली होती. तक्रारदार पीडित विद्यार्थिनी १२वीमध्ये शिकत होती. या विद्यार्थिनीला प्रकल्प करून देण्याच्या निमित्ताने कवठे याने आपल्या घरी बोलाऊन तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले होते.

पीडित तरुणीने धाडसाने स्वत:ची सुटका करून घेतली व घरी परतली. मात्र दुसऱ्या दिवशी या शिक्षकाने दुसऱ्या मुलाजवळ निरोप देऊन तिला बोलावले. पीडित तरुणी २४ आॅक्टोबर १३ रोजी या घटनेचा जाब विचारण्यासाठी कुमठे यांच्या निवासस्थानी सुरू असलेल्या शिकवणी वर्गाच्या दारात गेली.यावेळी पुरकान कुमठे याने पीडितेला शिवीगाळ करून ठार मारण्याची धमकी दिली होती. यासंदर्भात पीडित तरुणीने चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. या खटल्यात सरकार पक्षातर्फे आठ साक्षीदार तपासण्यात आले तर संशयित आरोपीच्या वकिलांनी दोन बचावाचे साक्षीदार सादर केले. मात्र सरकार पक्षाच्या उलट तपासणीत हे साक्षीदार टिकू शकले नाहीत. सरकार पक्षातर्फे या खटल्याचे काम सरकारी विधीतज्ज्ञ मेघना बारटक्के यांनी पाहिले.

टॅग्स :Courtन्यायालयRatnagiriरत्नागिरी