शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

वैधमापन शास्त्र कार्यालयाकडून २२९ जणांवर खटले; १० लाखाचा दंड वसूल

By शोभना कांबळे | Updated: February 13, 2024 19:11 IST

रत्नागिरी-सिंधुदूर्ग जिल्ह्यातील २९२ आस्थापनांना अचानक भेटी देत केली पाहणी

रत्नागिरी : येथील उपनियंत्रक वैधमापन शास्त्र कार्यालयाने रत्नागिरी व सिंधुदूर्ग जिल्ह्यात एप्रिल २०२३ ते जानेवारी २०२४ या कालावधीत २९२ आस्थापनांना अचानक भेटी दिल्या. यात २२९ जणांवर खटले नोंदविण्यात आले असून, १० लाख १२ हजार ३०० रूपये दंडाची वसुली करण्यात आली आहे. तसेच वजने व मापन तोलन उपकरणे यांची पडताळणी व मुद्रांक शुल्क १ कोटी २९ लाख ३६ हजार ८९९ इतकी रक्कम शासनाकडे जमा करण्यात आली आहे, अशी माहिती वैध मापन शास्त्र प्रभारी उपनियंत्रक राम राठोड यांनी दिली.महाराष्ट्र शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग अंतर्गत वैध मापन शास्त्र यंत्रणा कार्यरत आहे. रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्याकरिताचे जिल्हास्तरीय कार्यालय येथील जिल्हाधिकारी आवारात आहे. जिल्ह्यात तालुकास्तरीय निरीक्षक, वैध मापन शास्त्र कार्यालय रत्नागिरी, राजापूर, संगमेश्वर, चिपळूण व दापोली येथे कार्यरत आहेत. तसेच सिंधुदूर्ग जिल्ह्याकरिता मालवण, कणकवली व सांवतवाडी ही तीन कार्यालय आहेत.वैध मापन शास्त्र यंत्रणेकडून वैध मापन शास्त्र कार्यालय अंतर्गत वजने व मापे यांची पडताळणी करणे, वजने मापे यांची तपासणी करणे व वजने मापे कायद्यांतर्गत वजनात व मापात फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांविरुध्द कारवाई केली जाते. याचबरोबर पॅक बंद वस्तूवरील उद्घोषणा तपासणी, छापील किंमतीपेक्षा जास्त किंमत आकारणाऱ्या दुकानदारांविरुद्ध कारवाई करणे, तसेच या कायद्यांतर्गत नोंदविलेले खटले न्यायालयात दाखल करणे अपराध्यांविरुध्द न्यायालयीन प्रकिया पार पाडून, अपराध्यांस शिक्षा होईल अशी कारवाई करणे. असे कामकाज केले जाते.रत्नागिरी व सिंधुदूर्ग जिल्ह्यातील एप्रिल २०२३ ते जानेवारी २०२४ या कालावधीत एकूण २९२ आस्थापनांना अचानक भेटी देण्यात आल्या. यामध्ये एकूण २२९ एवढे खटले नोंद करण्यात आले. यांपैकी १६२ खटले निकाली काढण्यात आले. भेटी देऊन कारवाई वैध मापन शास्त्र यंत्रणेकडून नियमित, अचानकपणे व ग्राहक तक्रारीच्या अनुषंगाने आस्थापनेस भेटी देउन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या व्यापाऱ्यांविरुध्द जिल्ह्यात व्यापकपणे कारवाई करण्यात येत आहे. आठवडे बाजार, दैनंदिन बाजार पेठा, भाजी मार्केट, मच्छी मार्केट व इतर बाजारपेठेंमधील दुकानांना भेटी देऊन कारवाई करण्यात येत आहे.

व्यापाऱ्यांकडून वजने व मापे यांची फसवणूक होत असल्यास, वैध मापन शास्त्र यंत्रणेकडे तक्रार करावी. आपल्या तक्रारीवर सात दिवसांच्या आत कारवाई करुन ग्राहकांना याबाबत कळविण्यात येईल. ग्राहक तक्रारींकरिता कोकण भवन ०२२२७५७४०७४ टोल फ्री क्रमांक 1800114000/1915, ई मेल aclmratnagiri@yahoo.in/dyclmms@yahoo.in/dyclmmscomplaint@yahoo.com यावर संपर्क करावा.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी