शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
2
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
3
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
4
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
5
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
6
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
7
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
8
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
9
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
10
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
11
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
12
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
13
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
14
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
15
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
16
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
17
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
18
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
19
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
20
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!

अडीच हजार विद्यार्थ्यांची सुरक्षित वाहन चालविण्याची प्रतिज्ञा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2020 11:48 IST

‘मी भारताचा प्रामाणिक नागरिक असून, विनापरवाना वाहन चालविणार नाही. रस्त्यावर थुंकणार नाही. विनाकारण हॉर्न वाजविणार नाही. वयस्कर व्यक्तींना मदत करीन. स्वच्छता राखीन’, अशी प्रतिज्ञा कोल्हापूर शहरातील अडीच हजार विद्यार्थ्यांनी केली आहे. रोटरी क्लब आॅफ कोल्हापूर सेंट्रलच्या उपक्रमात ते सहभागी झाले. या उपक्रमांतर्गत ‘रोटरी’च्या वतीने शाळा, महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांमध्ये वाहतुकीच्या नियमांबाबत प्रबोधन केले जात आहे.

ठळक मुद्देरोटरी क्लब आॅफ कोल्हापूर सेंट्रलचा उपक्रम शाळा, महाविद्यालयांत वाहतुकीच्या नियमांबाबत प्रबोधन

संतोष मिठारीकोल्हापूर : ‘मी भारताचा प्रामाणिक नागरिक असून, विनापरवाना वाहन चालविणार नाही. रस्त्यावर थुंकणार नाही. विनाकारण हॉर्न वाजविणार नाही. वयस्कर व्यक्तींना मदत करीन. स्वच्छता राखीन’, अशी प्रतिज्ञा कोल्हापूर शहरातील अडीच हजार विद्यार्थ्यांनी केली आहे. रोटरी क्लब आॅफ कोल्हापूर सेंट्रलच्या उपक्रमात ते सहभागी झाले. या उपक्रमांतर्गत ‘रोटरी’च्या वतीने शाळा, महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांमध्ये वाहतुकीच्या नियमांबाबत प्रबोधन केले जात आहे.नववी ते बारावीपर्यंत विद्यार्थ्यांमध्ये वाहने चालविण्याबाबत मोठे आकर्षण असते. अनेकदा परवाना आणि वाहतुकीच्या नियमांची माहिती नसताना त्यांच्याकडून वाहन चालविण्यात येते. त्यातून अपघात घडले आहेत. ते टाळण्यासाठी या विद्यार्थ्यांचे प्रबोधन करण्याच्या उद्देशाने रोटरी क्लब आॅफ कोल्हापूर सेंट्रलने ‘रोड सेफ्टी अवरनेस वर्कशॉप’ हा उपक्रम सप्टेंबर २०१८ पासून हाती घेतला.

याअंतर्गत ‘रोटरी’च्या या उपक्रमाचे समन्वयक रवी मायदेव, प्राचार्य डॉ. महादेव नरके, अभिजित माने यांच्याकडून रस्ता सुरक्षा व वाहतुकीच्या नियमांबाबत व्हिडीओ, छायाचित्रांचा समावेश असलेल्या पॉवरपाँईट प्रेझेंटेशनद्वारे ४५ मिनिटे मार्गदर्शन केले जाते. आतापर्यंत १0 शाळांतील अडीच हजार विद्यार्थ्यांचे प्रबोधन करण्यात आले. या विद्यार्थ्यांनी सुरक्षित वाहन चालविण्याची प्रतिज्ञा केली आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून १0 हजार विद्यार्थ्यांचे प्रबोधन केले जाणार आहे.

सिग्नल परिसरात लावणार रोडसाईनअपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी विद्यार्थी, तरुणाईचे प्रबोधन करणे महत्त्वाचे आहे. ते लक्षात घेऊन आम्ही उपक्रम सुरू केला आहे. १0 हजार विद्यार्थ्यांचे प्रबोधन करण्याचे ध्येय आहे. एप्रिलमध्ये वाहतूक विभागाच्या सहकार्याने शहरातील प्रमुख चौकांतील सिग्नलच्या परिसरात रोडसाईन लावण्यात येणार आहेत. वाहतुकीच्या नियमांची माहिती देण्यासाठी हे रोडसाईन लावण्याचा उद्देश आहे, अशी माहिती रोटरी क्लब आॅफ कोल्हापूर सेंट्रलचे अध्यक्ष डॉ. सचिन कुलकर्णी यांनी सांगितले. 

 

टॅग्स :Rotary Clubरोटरी क्लबTrafficवाहतूक कोंडीkolhapurकोल्हापूर