शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

सात जिल्ह्यांमध्ये एकाच अधिकाऱ्याकडे प्राथमिक व माध्यमिकचा कार्यभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2018 16:41 IST

राज्यातील शिक्षण विभागमधील अधिकाऱ्यांकडे अतिरिक्त कार्यभार देण्याबाबत राज्य शासनाच्या सहसचिवांनी एक परिपत्रक जाहीर केले आहे. या परिपत्रकानुसार रत्नागिरी, हिंगोली, बुलढाणा, उस्मानाबाद, लातूर, वर्धा व गडचिरोली या सात जिल्ह्यांमध्ये प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकारी पदाचा कार्यभार एकाच व्यक्तीकडे सोपविला आहे.

ठळक मुद्देसात जिल्ह्यांमध्ये एकाच अधिकाऱ्याकडे प्राथमिक व माध्यमिकचा कार्यभारशासनाचाच शिक्षण विभागाच्या कामकाजाला ब्रेक !

सागर पाटील टेंभ्ये : राज्यातील शिक्षण विभागमधील अधिकाऱ्यांकडे अतिरिक्त कार्यभार देण्याबाबत राज्य शासनाच्या सहसचिवांनी एक परिपत्रक जाहीर केले आहे. या परिपत्रकानुसार रत्नागिरी, हिंगोली, बुलढाणा, उस्मानाबाद, लातूर, वर्धा व गडचिरोली या सात जिल्ह्यांमध्ये प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकारी पदाचा कार्यभार एकाच व्यक्तीकडे सोपविला आहे.विशेष म्हणजे लातूरच्या माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांकडे उस्मानाबाद जिल्ह्याचा प्राथमिक शिक्षणाधिकारी पदाचा तर लातूरच्या प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांकडे उस्मानाबाद जिल्ह्याचा माध्यमिक शिक्षणाधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे.

तसेच गडचिरोली, ठाणे, रत्नागिरी व बीड जिल्ह्यात उपशिक्षणाधिकाऱ्यांकडे दोन्ही विभागाचा कार्यभार देण्यात आला आहे. राज्याच्या शिक्षण विभागात प्रथमच शासन आदेश काढला असल्याचे बोलले जात आहे.या आदेशामुळे जिल्ह्यातील शिक्षण विभागाच्या कामकाजाला शासनानेच ब्रेक लावल्याची स्थित निर्माण झाली आहे. महाराष्ट्र शासनाचे सहसचिव यांनी नुकतेच अतिरिक्त कार्यभार बाबत जाहीर केलेल्या आदेशामुळे जिल्ह्यातील शिक्षण विभागातील कार्यभार अतिरिक्त बनला आहे.

जिल्ह्यातील शिक्षण विभागात केवळ एक पूर्णवेळ शिक्षणाधिकारी कार्यरत आहे, याकडे शासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे बोलले जात आहे. यात भर म्हणून सध्या चाललेल्या कामकाजाला ब्रेक लावण्याचे काम शासन स्तरावरून केले जात आहे.सध्या संपूर्ण जिल्ह्यात केवळ एक शिक्षणाधिकारी कार्यरत आहेत. प्रत्यक्षात जिल्ह्यामध्ये प्राथमिक, माध्यमिक व निरंतर या तिन्ही विभागांसाठी पूर्णवेळ शिक्षणाधिकारी कार्यरत असणे आवश्यक आहे. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागात चार उपशिक्षणाधिकारी कार्यरत असणे आवश्यक आहे.

सध्या मात्र केवळ एक उपशिक्षणाधिकारी कार्यरत आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून काहीअंशी फरकाने शिक्षण विभागाची अशीच दुरावस्था पाहायला मिळत आहे. दोन्ही विभागांच्या सुरळीत चाललेल्या कामाला या आदेशामुळे ब्रेक लागेल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रRatnagiriरत्नागिरी