शहरं
Join us  
Trending Stories
1
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
2
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
3
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
4
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
5
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
6
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
7
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
8
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
9
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
10
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
11
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
12
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
13
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
14
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
15
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
16
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
17
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
18
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
19
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
20
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला

आर्मीतून बोलत असल्याची बतावणी, आईस्क्रिम विक्रेत्यास घातला ५१ हजाराचा गंडा; रत्नागिरीतील घटना

By अरुण आडिवरेकर | Updated: June 30, 2023 19:15 IST

आर्मीची पार्टी आहे, असे सांगून तीनशे लोकांसाठी अमेरिकन ड्रायफ्रुट्स आईस्क्रिम हवे आहे असे सांगितले.

रत्नागिरी : आर्मीतून बोलत असल्याची बतावणी करत रत्नागिरी तालुक्यातील निवळी येथील आईस्क्रिम विक्रेत्याची अज्ञाताने ऑनलाइन ५१ हजार रुपयांचा गंडा घातला. याप्रकरणी गोवर्धन भागू गाडरी (२५, रा. निवळी तिठा, मूळ रा. राजस्थान) यांनी रत्नागिरी ग्रामीण पोलिस स्थानकात फिर्याद दिली आहे.गोवर्धन गाडरी यांचा निवळी तिठा येथे आईस्क्रिम विक्रीचा व्यवसाय आहे. दि. १९ जून रोजी ते नेहमीप्रमाणे आपल्या दुकानात आईस्क्रिम विक्री करत असताना दुपारी ३ च्या सुमारास त्यांना अज्ञाताने फोन केला. यावेळी समोरील व्यक्तिने आपण आर्मीतून मेजर बोलत असून, दि. २० जून २०२३ रोजी रत्नागिरीतील चरवेली येथे आर्मीची पार्टी आहे, असे सांगितले. यावेळी तीनशे लोकांसाठी अमेरिकन ड्रायफ्रुट्स आईस्क्रिम हवे आहे असे सांगितले.आईस्क्रिम देण्याची ऑर्डर मान्य करत गोवर्धन यांनी आगाऊ रकमेची मागणी केली. मात्र, आर्मीमध्ये गुगल पे, फोन पे चालत नाही. आईस्क्रिम पोच होताच तुमचे पैसे देण्यात येतील, असे त्याने सांगितले. त्याच्या बोलण्यावर गोवर्धन व त्यांचा मावस भाऊ हे आईस्क्रिम घेऊन चरवेली येथे पोहचले. यावेळी गेटपास तयार करावयाचा आहे, असे सांगून तक्रारदार यांना चरवेली मंदिराजवळ थांबवून ठेवण्यात आले.ऑनलाईन पेमेंट करण्यासाठी फोनवरून बोलणाऱ्या व्यक्तिने आमचे कॅप्टन तुमच्याशी बोलणार आहेत, असे सांगितले. यानंतर कॅप्टन म्हणून बोलणाऱ्या व्यक्तिने तक्रारदार यांच्या मोबाइलवर स्कॅनर कोड पाठवून डाऊनलोड करण्यास सांगितले. स्कॅनर डाऊनलोड केल्यानंतर त्यामाध्यमातून आर्मीचे नियम असल्याचे सांगून त्यांनाच पैसे भरण्यास सांगितले. त्यानुसार गाडरी यांनी ५१ हजार रूपये संबंधित व्यक्तिला ऑनलाइन पद्धतीने दिले. मात्र, त्याबदल्यात त्यांच्या खात्यावर पैसे जमा झाले नाहीत. आपली फसवणूक झाल्याचे गाडरी यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी रत्नागिरी ग्रामीण पोलिस स्थानकात फिर्याद दिली आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीfraudधोकेबाजीCrime Newsगुन्हेगारी