शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

Ratnagiri: आजारी वडिलांची सेवा करणारा 'प्रणय' ऐन तारूण्यात गेला; सगळ्यांच्या काळजाचा ठोका चुकला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2025 18:28 IST

अंगणातील कचरा काढताना घामाघूम झाला. तत्काळ खासगी दवाखान्यात आणले, पण..

सचिन मोहितेदेवरुख : वडील गेले काही दिवस पॅरालिसिसने आजारी, त्यांना अंघोळ घालणे, जेवण भरवणे, वेळच्या वेळी गोळ्या देणे, त्यांच्यासोबत गप्पा मारत त्यांची सेवा करणाऱ्या तरुण मुलाचे हात अचानक आता थांबले आणि अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला आहे. संगमेश्वर तालुक्यातील तेर्ये बौद्धवाडी येथील प्रणय नंदराज मोहिते याने वयाच्या २५ व्या वर्षी हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने जगण्यातून अनपेक्षित एक्झिट घेतली आहे. ऐन उमेदीतील या तरुणाच्या जाण्याने सर्वांनाच हुरहुर लागली आहे. ही घटना मंगळवार ५ ऑगस्ट रोजी सकाळी घडली.संगमेश्वर तालुक्यातील तेर्ये गावातील प्रणयचे शिक्षण रत्नागिरीतील गोगटे जोगळेकर महाविद्यालयात झाले. प्रणयने आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत रंगमंचीय कला जोपासली होती. तो उत्तम कलाकार होता. माता रमाई जनसेवा संगीत जलसा मंडळ तेर्ये यात तो चांगल्या प्रकारे भूमिका करून कला सादर करीत होता आणि एका मेडिकल कंपनीमध्ये तो मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून काम करत होता.प्रणयचे वडील गेली काही वर्षे अर्धांगवायूने ग्रस्त आहेत. त्यांनी गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात नोकरी केली. गेली पाच ते सहा वर्षे ते आजारी असल्याने त्यांची नियमित सेवा प्रणय आपल्या आईसमवेत करीत होता. वडिलांना अंघोळ घालणे, त्यांना उचलणे, औषध देणे यासोबत त्यांच्या बरोबर गप्पा मारुन त्यांच्या मनावरील आजारपणाचे ओझे हलके करण्यास साहाय्य करत होता.प्रणयने मंगळवारी आपल्या मोठ्या भावाला संगमेश्वर बसस्थानकात सोडले आणि घरी परत आल्यावर तो अंगणातील कचरा काढत होता. यावेळी तो घामाघूम झाला. त्याच्या पाठीत-छातीत दुखू लागले. त्याच्या आईने आणि त्याचा चुलत भाऊ अजित मोहिते यांनी तत्काळ बुरंबीतील खासगी दवाखान्यात आणले. तेथील डॉक्टरांनी तत्काळ संगमेश्वर ग्रामीण रुग्णालय गाठण्यास सांगितले. तेथून प्रणयला संगमेश्वर रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, याचदरम्यान त्याची प्राणज्योत मालवली होती. त्याचे असे जाणे साऱ्यांसाठीच धक्कादायक ठरले आहे. प्रणयच्या पश्चात त्याची आई-वडील, मोठा भाऊ, बहीण, वहिनी असा परिवार आहे.