शहरं
Join us  
Trending Stories
1
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
2
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
5
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
6
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
7
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
8
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
9
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
10
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
11
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
12
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
13
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
14
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
15
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
17
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 
18
आरारारा खतरनाक! 'या' देशात भाडे तत्वावर मिळतो बॉयफ्रेंड; मोजावे लागतात 'इतके' पैसे
19
६ महिन्यांत ६ वेळा बंद पडली अभिनेत्रीची नवीन कार! मनवा नाईकने शेअर केला भयानक अनुभव, म्हणाली...
20
आमची कसदार जमीन ‘शक्तीपीठला’ देणार नाही; भाटेगाव परिसरातील शेतकऱ्यांचा विरोध

मुरूड येथील बांधकाम पाडण्याच्या आदेशाला स्थगिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:35 IST

दापोली : तालुक्यातील मुरुड येथील साई रिसॉर्टचे बांधकाम पाडण्याचे आदेश उपविभागीय अधिकारी यांनी २२ जून राेजीच दिले हाेते. या ...

दापोली : तालुक्यातील मुरुड येथील साई रिसॉर्टचे बांधकाम पाडण्याचे आदेश उपविभागीय अधिकारी यांनी २२ जून राेजीच दिले हाेते. या आदेशाविराेधात हाॅटेलमालक सदानंद कदम यांनी न्यायालयात धाव घेतली हाेती. याप्रकरणी खेड येथील सत्र न्यायालयाने उपविभागीय अधिकारी यांच्या आदेशाला स्थगिती दिली आहे. त्यामुळे हॉटेलमालक सदानंद कदम यांना तूर्तास दिलासा मिळाला असून, भाजप नेते किरीट साेमय्या यांच्या याचिकेलाही शह बसला आहे.

दापोली तालुक्यातील मुरुड येथील रिसॉर्ट हे पालकमंत्री अनिल परब यांचे असल्याचा आरोप भाजपचे किरीट सोमय्या यांनी केला हाेता. त्यानंतर अनिल परब यांनीही किरीट सोमय्या यांना प्रतिआव्हान देत या आरोपाबाबत एका आठवड्याच्या आत माफी मागावी, अन्यथा आपण १०० कोटी रुपयांचा अब्रूनुकसानीचा दावा दाखल करण्याचा इशारा दिला आहे. याबाबत दापोली उपविभागीय कार्यालयात याबाबत चौकशी केली असता उपविभागीय कार्यालयाने सदानंद कदम यांच्या नावाने २२ जून रोजी आदेश दिला होता.

या आदेशामध्ये हे बांधकाम सीआरझेड क्षेत्रात असल्यामुळे व समुद्राच्या उच्चतम भरतीपासून ५०० मीटरच्या आत असल्याने या बांधकामावर आक्षेप घेतला होता. शिवाय हे बांधकाम महसूल अधिनियम १९६६ चे कलम ५२ व ५३ अन्वये एक महिन्याच्या आत पाडून टाकण्याचे आदेश दिले हाेते. एक महिन्याच्या आत बांधकाम पाडले नाही तर महसूल विभाग कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना न देता बांधकाम पाडेल, असेही म्हटले हाेते. यानंतर सदानंद कदम यांनी खेड येथील सत्र न्यायालयात या आदेशाच्या विरोधात धाव घेतली. न्यायालयाने पुढील निर्णय होईपर्यंत स्थगिती आदेश दिलेला आहे. याप्रकरणी न्यायालयांमध्ये दोन तारखांची सुनावणी झाली असून, आता २८ ऑक्टोबर ही पुढील तारीख देण्यात आली आहे.

-------------------------

जागेची २०१९ मध्येच विक्री

ही जागा विभास साठे यांच्या नावाने होती. ती त्यांनी २०१९ ला अनिल परब यांना विक्री केली. अनिल परब यांनी त्याचवर्षी ही जागा सदानंद कदम यांना विक्री केल्याचे उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडून सांगण्यात आले. त्यामुळे ही नोटीस सदानंद कदम यांच्या नावाने काढण्यात आल्याचे उपविभागीय कार्यालयाने स्पष्ट केले. बिनशेतीचा आदेश साठे यांच्या नावाने व बांधकामाची परवानगी कदम यांच्या नावाने असल्याचे स्पष्ट केले.