शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे समस्यांबाबत मडगाव येथील बैठकीत सकारात्मक चर्चा : सचिन वहाळकर

By शोभना कांबळे | Updated: July 13, 2023 17:34 IST

रत्नागिरी : कोकण रेल्वे प्रवासी सल्लागार समितीची बैठक कोकण रेल्वेचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक संजय गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली मडगाव येथे ...

रत्नागिरी : कोकण रेल्वे प्रवासी सल्लागार समितीची बैठक कोकण रेल्वेचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक संजय गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली मडगाव येथे झाली. या बैठकीला महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ या चार राज्यातील प्रतिनिधी तसेच कोकण रेल्वेचे सर्व संचालक उपस्थित होते. बैठकीत रेल्वे समस्यांबाबत सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती या समितीचे सदस्य सचिन वहाळकर यांनी दिली.कोकण रेल्वेची आर्थिक स्थिती, भारतीय रेल्वेची बदललेली धोरणं,कोकण रेल्वे देशात करत असलेले प्रकल्प, चार राज्यांचा भाग भांडवलातील आतापर्यंतचा सहभाग, प्रवासी वाहतूक व माल वाहतुकीने मिळणारे उत्पन्न, नजिकच्या काळात विद्युतीकरण, तसेच मार्ग सुरक्षित करण्यासाठी झालेल्या उपाययोजना याबाबत संजय गुप्ता यांनी माहिती दिली.सचिन वहाळकर यांनी यावेळी पुणे- सावंतवाडी ही गाडी कायमस्वरुपी प्रत्येक वीकएंडला सुरू ठेवण्याची मागणी केली. या गाडीची शिफारस रेल्वेबोर्डाकडे करण्याचा निर्णय घेण्यात आला. पॅसेंजरला संगमेश्वरसाठीचा राखीव डबा पुर्वीप्रमाणे दहा जुलैपासून जोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वहाळकर यांनी केलेल्या मागणीनुसार अनेक ठराव करण्यात आले. त्यानुसार कोरोनापुर्वीचे सर्व हाॅल्टस कायम करण्यात यावेत, बांद्रा टर्मिनस किंवा वसई येथून रोज एक गाडी सोडण्यात यावी, गणपतीसाठी पनवेल- चिपळूण या मार्गावर डिमयू सुरू करुन त्याच्या पंचवीस फेऱ्या प्रस्तावित करण्याचा निर्णय झाला. गणपती स्पेशल ट्रेन ३०८ प्रस्तावित असून त्या पैकी २०६ गाड्यांचे नोटिफिकेशन जुलैअखेर झाले आहे.वहाळकर यांनी या वेळी गणपती बुकिंगदरम्यान एक मिनीटात सर्व बुकिंग फुल झाल्याचा मुद्दा उपस्थित करून कोकण रेल्वेकडून कोणतीही माहिती स्थानिक माध्यमांमधून प्रवासी वर्गाला न दिल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. भविष्यात जनसंपर्क विभागाने याची व इतर वृत्तांची दखल तातडीने घेण्याची सुचना केली. महाराष्ट्र सरकारकडून रत्नागिरी सिंधुदुर्ग मधील स्टेशनना जोडणाऱ्या रस्त्यांच्या काॅन्क्रीटिकरणासाठी ६५ कोटींची तरतूद केल्याबद्दल राज्य सरकार व सार्वजनिक बांधकाम मंत्री रविन्द्र चव्हाण यांच्या अभिनंदनाचा ठराव वहाळकर यांनी मांडला. वरीष्ठ नागरीकांना दिली जाणारी श्रावण सेवा पुर्ववत केल्याबद्दल रेल्वेप्रशासनाचे आभार मानले.

खासदार धनंजय महाडिक यांनी वैभववाडी कोल्हापूर या प्रकल्पाबाबतचा प्रस्ताव रेल्वेमंत्रालयाकडे आहे, याबाबत आपण स्वतः पाठपुरावा करु, असे सांगितले. भविष्यात कोकण रेल्वेवरील छोट्या स्थानकांना भेट देऊन तेथील समस्या सोडवण्याबाबत पाठपुरावा करणार असल्याचे वहाळकर यांनी सांगितले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीrailwayरेल्वेKonkan Railwayकोकण रेल्वे