शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी जिल्हा कृषी, औद्योगिक संघ संचालकपदी पूजा निकम, ऋतुजा कुळकर्णी

By मनोज मुळ्ये | Updated: November 7, 2023 17:23 IST

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा कृषी औद्योगिक सर्व सेवा संघाच्या संचालकपदी राष्ट्रवादीच्या पूजा शेखर निकम आणि भाजपच्या ऋतुजा उमेश कुळकर्णी ...

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा कृषी औद्योगिक सर्व सेवा संघाच्या संचालकपदी राष्ट्रवादीच्या पूजा शेखर निकम आणि भाजपच्या ऋतुजा उमेश कुळकर्णी यांची बिनविरोध निवड झाली आहे.भाजपचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष आणि जिल्हा बँकेचे संचालक, सहकारतज्ज्ञ ॲड. दीपक पटवर्धन, तसेच जिल्हा बँकेचे अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे, उपाध्यक्ष बाबाजी जाधव यांनी कृषी, औद्योगिक संघाच्या संचालकपदी कोणी अर्ज भरायचे हे ठरवले होते. त्यामुळे एक जागा राष्ट्रवादीला व दुसरी जागा भाजपला मिळाली आहे.

बिनविरोध निवडून आलेल्या संचालिका ऋतुजा कुळकर्णी रत्नागिरी तालुक्यातील धामणसे ग्रामपंचायतीच्या सदस्य आहेत. यापूर्वी त्यांनी सदस्यपदाची निवडणूक दोन वेळा लढवली आणि त्या विजयी झाल्या आहेत. त्या धामणसे विविध कार्यकारी सोसायटीच्या तज्ज्ञ संचालिका आहेत. त्या भारतीय जनता पक्षाच्या सक्रिय कार्यकर्त्या असून, नजीकच्या काळात जिल्हा खरेदी विक्री संघावर संचालक म्हणून निवडून आलेल्या पहिल्या महिला ठरल्या आहेत. कृषी, औद्योगिक संघाच्या संचालकपदी निवड झाल्यानंतर ऋतुजा कुळकर्णी यांनी सर्वांचे आभार मानून भविष्यात शेतीसंदर्भाने, शेतकरी, उद्योजकांना उपयुक्त असे कामकाज करू, असे मत व्यक्त केले.पूजा निकम या चिपळूण पंचायत समितीच्या माजी सभापती असून, त्या राजकारणासह सहकार व सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. या बिनविरोध निवडीबद्दल भाजपचे नेते, राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांच्यासह भाजप पदाधिकाऱ्यांनी ऋतुजा कुळकर्णी यांचे अभिनंदन केले आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी