शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

राजकीय पक्षांना अंतर्गत गटबाजी भोवणार?

By admin | Updated: October 9, 2016 23:36 IST

जिल्हा परिषद निवडणूक : नेतृत्त्वाची होणार अग्निपरीक्षा !

रत्नागिरी : नगरपरिषद, नगरपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या निवडणुका लवकरच होत असल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. स्वपक्षातील विरोधकांना ‘आसमान’ दाखविण्यासाठी कारवाया सुरू आहेत. या कुरघोडींनी पक्ष पोखरले असून, येणाऱ्या निवडणुकांमध्ये सर्वच पक्षांना त्याचा जबर फटका बसण्याची शक्यता आहे. अंतर्गत गटबाजीचे हे ग्रहण सोडविणे प्रत्येक पक्षाच्या वरिष्ठांसाठी अग्निपरीक्षाच ठरणार आहे. गेल्या पंधरा वर्षांपासून जिल्हा परिषदेवर शिवसेनेचे वर्चस्व आहे. पंचायत समित्याही सेनेकडे आहेत. जिल्ह्यातील बहुतांश ग्रामपंचायतींवरही सेनेचे सरपंच आहेत. गेल्या पंधरा ते वीस वर्षात जिल्ह्यात सेनेच्या राजकीय ताकदीचा आलेख उंचावला. मात्र, खुर्ची, पदे, उमेदवारी यासाठी आता सेनेतही अनेक दावेदार निर्माण झाले आहेत. त्यातूनच गटबाजीचे वारे वाहात आहेत. उत्तर रत्नागिरीत शिवसेना भक्कम होती. परंतु गेल्या निवडणुकीत दापोली -मंडणगड विधानसभा मतदारसंघात सूर्यकांत दळवी यांचा पराभव झाला होता. रत्नागिरी - रायगड लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करणारे केंद्रीय मंत्री अनंत गीते व पर्यावरणमंत्री रामदास कदम यांचे मनोमीलन झाल्याने राजकीय समीकरणे बदलली. पर्यावरण मंत्री कदम यांनी मुलगा योगेश याला दापोली - मंडणगड विधानसभा मतदारसंघासाठी भावी उमेदवार म्हणून पुढे आणले आहे. त्यासाठी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांच्याशी जवळीक साधली आहे. परिणामी माजी आमदार सूर्यकांत दळवी यांच्या पुढील विधानसभा निवडणूक उमेदवारीपुढे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दळवी भाजपमध्ये जाणार असल्याचीही हवा आहे. चिपळूण, दक्षिण रत्नागिरीमध्येही शिवसेनेत अनेक गट तट आहेत. एकमेकांची कोंडी करण्यासाठी सध्या त्यांच्यातही कुरघोडीचे राजकारण सुरू आहे. त्यामुळेच येत्या नगरपरिषद, पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकीत विरोधी पक्षांपेक्षा पक्षांतर्गत विरोधकांशीच सेनेत दोन हात होणार असल्याचे चित्र आहे. नगरपरिषद निवडणुकीत रत्नागिरीतही सेनेतील असंतोष बाहेर पडण्याची शक्यता आहे. शिवसेनेशी टक्कर देणाऱ्या राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्येही कुरघोडींना जोर आला आहे. माजी मंत्री भास्कर जाधव यांच्याकडे जिल्ह्याची जबाबदारी असली तरी चिपळुणात राष्ट्रवादीचे नेते, माजी आमदार रमेश कदम यांच्याशी त्यांचे विळ्या-भोपळ्याचे सख्य आहे. चिपळूण शहर व तालुक्यावरही रमेश कदम यांचा प्रभाव आहे. त्यामुळे चिपळुणातही राजकीय हडकंप माजण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात कॉँग्रेसची अवस्था दयनीय आहे. निवडणूक जवळ आली तरी या पक्षाकडे जिल्हाध्यक्ष नाही. जिल्हाध्यक्षपदासाठी कॉँग्रेसमधील नेत्यांमध्ये भांडणे आहेत. पक्षबळ कमी असतानाही कॉँग्रेसमध्ये अन्य पक्षांपेक्षा अधिक भांडणे आहेत. नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकांमध्ये या राजकीय गटबाजीचा सर्वच पक्षांना मोठा फटका बसण्याची भीती व्यक्त होत आहे. (वार्ताहर) मतांचे विभाजन होणार विधानसभेच्या गेल्या निवडणुकीत सेना-भाजप युती तुटली. त्यानंतर जिल्ह्यातील राजकीय गणितेही बदलली आहेत. सेना, राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये अंतर्गत भांडणे, मतभेद मोठ्या प्रमाणात आहेत. त्या तुलनेत भाजपाअंतर्गत मतभेद सध्यातरी कमी आहेत. ‘एकला चलो रे’चा नारा देत भाजपची वाटचाल जिल्ह्यात सुरू आहे. जिल्हाध्यक्ष बाळ माने यांनी गेल्या सहा महिन्यांच्या काळात जिल्ह्यात संघटना बांधणीचे प्रयत्न केले आहेत. तरीही जिल्ह्यात भाजपची ताकद खूप मोठी नाही. परंतु यावेळी युती नसल्याने सेना व भाजपच्या मतांचे विभाजन होणार आहे.