शहरं
Join us  
Trending Stories
1
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
2
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
3
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
4
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
5
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
6
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
7
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
8
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
9
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
10
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
11
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
12
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
13
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
14
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
15
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
16
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
17
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
18
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
19
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
20
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

लांजात जुगार अड्ड्यावर धाड, बडे राजकीय पुढारी अडकले जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2021 19:11 IST

राजकीय पुढारी अडकल्याने लांजा तालुक्यात जोरदार चर्चा

लांजा : तालुक्यातील कोर्ले तिठा येथील एका हॉटेलच्या मागील बाजूला रत्नागिरीच्या गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने धाड टाकली. या धाडीत तीन पत्ते जुगार खेळणारे तेरा बडे राजकीय पुढारी जाळ्यात सापडले आहेत. पोलिसांनी याठिकाणाहून ४४,५५० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. काल, शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस हवालदार संजय कांबळे यांनी फिर्याद दिली असून, १३ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.कोर्ले येथील एका हॉटेलच्या मागील बाजूला रिकाम्या जागेमध्ये दिवसाढवळ्या मोठ्या प्रमाणात तीन पत्ते खेळण्यात येत होता. याबाबत रत्नागिरीच्या गुन्हे अन्वेषण विभागाला माहिती मिळाली होती. त्यानुसार गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक हेमंतकुमार शहा, उपनिरीक्षक संदीप वांगणेकर, पोलीस हेडकॉन्स्टेबल सागर साळवी, विजय आंबेकर, संजय कांबळे, चालक दत्तात्रय कांबळे तेथे दाखल झाले. पोलिसांनी धाड टाकताच जुगार खेळणाऱ्यांची मोठी धावपळ उडाली. मात्र, पोलिसांनी पूर्वनियोजित सापळा रचल्याने जुगार खेळणारे सर्वजण पोलिसांच्या तावडीत सापडले.राजकीय पुढारी अडकल्याने लांजा तालुक्यात जोरदार चर्चाजुगार खेळणारे प्रतिष्ठित राजकीय पुढारी असल्याने त्यांच्यावर पडलेल्या धाडीची भांबेड - कोर्ले विभागासह लांजा तालुक्यात जोरदार चर्चा सुरु झाली. गुन्हा अन्वेषण विभागाने केलेल्या कारवाईची कल्पना स्थानिक लांजा पोलिसांना दिल्यानंतर पोलीस निरीक्षक दादासाहेब घुटूकडे हे आपल्या पोलीस कर्मचारी यांना घेवून घटनास्थळी दाखल झाले. रात्री उशीरा पर्यंत पंचनामा केल्यानंतर लांजा पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला. आज, शनिवारी ताब्यात घेतलेल्या संशयितांना न्यायालयात हजर केले असता त्यांची जामिनावर मुक्तता करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल भालचंद्र रेवणे हे करीत आहेत.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी