मनोज मुळ्येरत्नागिरी : विकास कामांच्या उद्घाटनांवरून उत्तर रत्नागिरी जिल्ह्यात चांगलाच कलगी-तुरा रंगू लागला आहे. राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांच्याविरोधात शिवसेनेचे आमदार योगेश कदम यांनी हक्कभंगाचा प्रस्ताव दिला असून, त्यावरून आता आरोप प्रत्यारोप वाढू लागले आहेत. मात्र, केवळ उद्घाटनांचे निमंत्रण नाही म्हणूनच हा वाद सुरू झाला आहे की, त्यामागे अन्य काही कारण आहे, याबाबत राजकीय तर्कांना उधाण आले आहे.दापोली विधानसभा मतदार संघाचे आमदार योगेश कदम यांनी २० ऑक्टोबर रोजी खासदार सुनील तटकरे यांच्याविरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव दिला आहे. तेव्हापासून आरोप प्रत्यारोप वाढू लागले आहेत. ऑक्टोबर महिन्यात खासदार सुनील तटकरे यांनी मंडणगड, दापोली आणि गुहागरमध्ये विविध कार्यक्रमांना हजेरी लावली होती. काही उद्घाटनेही त्यांनी केली. त्यावरून नाराज झालेल्या योगेश कदम यांनी खासदार तटकरे यांच्याविरोधात विधानसभा अध्यक्षांकडे हक्कभंगाचा प्रस्ताव सादर केला आहे.या मुद्द्यावरून राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय कदम यांनी योगेश कदम यांच्यावर आरोप केले. आपल्या आमदारकीच्या काळात पाच वर्षे मंत्री रामदास कदम यांनी जी काही कामे केली, त्यावेळी आपल्यालाही डावलले गेल्याचा आरोप त्यांनी केला होता. या आरोपप्रत्यारोपांमुळे अनेक दिवसांनी जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापू लागले आहे.ही आहेत कारणे हक्कभंग प्रस्तावाचीहक्कभंगाचा प्रस्ताव दाखल केल्यानंतर योगेश कदम यांनी आपली भूमिका स्पष्ट केली होती. आपल्या मतदार संघात अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेताना आपल्याला निमंत्रित केले जात नाही. आपल्या मतदार संघात राज्य शासनाच्या निधीतून होणाऱ्या विकास कामांच्या उद्घाटनात आपल्याला डावलले जाते. त्यामुळे आपण हक्कभंगाचा प्रस्ताव दिला असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.पाटील यांनाही सुनावलेनुकतेच रत्नागिरी दौऱ्यावर आलेले मंत्री जयंत पाटील यांनी तटकरे यांची पाठराखण केली. त्यावरून आता आमदार कदम यांनी त्यांनाही काही गोष्टी सुनावल्या आहेत. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे सरकार असल्याने आपल्याला सोबत घेऊन तटकरे काम करतील, असे अपेक्षित होते. पण तसे त्यांनी केलेले दिसत नाही. राज्य सरकारच्या विकास कामांचे उद्घाटन करताना माजी आमदारांचे नाव फलकावर असते, पण आपले नसते, असे त्यांनी म्हटले आहे.
उत्तर रत्नागिरी जिल्ह्यात राजकीय कलगी-तुरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2020 16:49 IST
politics, shiv sena, ncp, ratnagirinews विकास कामांच्या उद्घाटनांवरून उत्तर रत्नागिरी जिल्ह्यात चांगलाच कलगी-तुरा रंगू लागला आहे. राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांच्याविरोधात शिवसेनेचे आमदार योगेश कदम यांनी हक्कभंगाचा प्रस्ताव दिला असून, त्यावरून आता आरोप प्रत्यारोप वाढू लागले आहेत. मात्र, केवळ उद्घाटनांचे निमंत्रण नाही म्हणूनच हा वाद सुरू झाला आहे की, त्यामागे अन्य काही कारण आहे, याबाबत राजकीय तर्कांना उधाण आले आहे.
उत्तर रत्नागिरी जिल्ह्यात राजकीय कलगी-तुरा
ठळक मुद्देउत्तर रत्नागिरी जिल्ह्यात राजकीय कलगी-तुरासुनील तटकरे, योगेश कदम यांच्यातील वाद पेटला