शहरं
Join us  
Trending Stories
1
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
2
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
3
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
4
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
5
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
6
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
7
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
8
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
9
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
10
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
11
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
12
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
13
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
14
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
15
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
16
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
17
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
18
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
19
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
20
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO

पोलिसांनी लावला ७७५ जणांचा शोध बेपत्ताचे प्रमाण वाढते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2016 00:40 IST

अल्पवयीन मुलांची संख्या अधिक

आकाश शिर्के - रत्नागिरी --रत्नागिरी शहरात गेल्या १३ वर्षांत ८३७जण बेपत्ता असल्याची नोंद पोलीस स्थानकात करण्यात आली होती. त्यामध्ये पुरूषांचे प्रमाण अधिक असून, बेपत्ता असलेल्या ७७५ जणांना शोधून काढण्यात पोलिसांना यश आले आहे.शहरामध्ये बेपत्ता होण्याच्या नोंदी शहर पोलीस स्थानकात होत आहेत. त्यामध्ये पुरूषांचे प्रमाण सर्वाधिक आहे. गेल्या १३ वर्षांत एकूण ८३७जण बेपत्ता झाल्याची नोंद पोलीस स्थानकात असून, त्यांना शोधण्याची जबाबदारी पोलिसांनी यशस्वीरित्या पार पाडली. सन २०११मध्ये सर्वांत कमी ४७ जण बेपत्ता असल्याची नोंद आहे. सन २०१४मध्ये ९६जण बेपत्ता झाले होते. त्यामध्ये ९४जणांचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले. सर्वांत जास्त बेपत्ताच्या नोंदी २००३ ते २०१५ या कालावधीत आहेत. ३०३ पुरूष व २८० महिला असे मिळून एकूण ५८३ स्त्री-पुरूष बेपत्ता झाल्याची नोंद रत्नागिरी शहर पोलीस स्थानकात करण्यात आली होती. त्यातील अजूनपर्यंत ५२१ जणांना शोधण्यात यश आले. शोध घेतलेल्यांमध्ये स्त्रिया २७१ असून, २८० पुरुषांचा समावेश आहे. बेपत्ता होण्याच्या नोंदीमध्ये स्त्री - पुरूषांचे प्रमाण सर्वाधिक आहे. २०१४ मध्ये एकूण सर्वाधिक ९६ बेपत्ता नोंदी झाल्या. सर्वांत कमी बेपत्ता नोंदी २०११मध्ये आहेत. सध्या शहरात गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असून, अल्पवयीन मुले बेपत्ता होण्याचे प्रमाण लक्षणीय आहे. अल्पवयीन मुलांचे अपहरण करून त्यांना वाममार्गाला लावण्याच्या प्रमाणातही वाढ होत आहे. त्यामुळे अल्पवयीन मुले बेपत्ता झाल्यास सध्या अपहरणाचा गुन्हा पोलीस स्थानकात दाखल केला जातो. गेल्या १३ वर्षात शहरातील २५४ अल्पवयीन मुले - मुली बेपत्ता असल्याच्या नोंदी शहर पोलीस स्थानकात करण्यात आल्या होत्या. त्यामध्ये १५१ मुलगे असून, १०३ मुलींचा सामावेश आहे. त्यातील २४४ मुला - मुलींना शोधण्यात पोलिसांना यश आले आहे. त्यामध्ये १४२ मुले व १०२ मुलींचा सामावेश आहे. तेरा वर्षात एकूण ८३७ जण बेपत्ता झाले होते. त्यातील ७७५ जणांना शोधण्यात पोलिसांना यश आले आहे. वाढत्या गुन्हेगारीच्या तुलनेत पोलीस स्थानकात अपुरे संख्याबळ असल्याचे दिसत आहे.अपुरे पोलीसबळपोलीस स्थानकावर संपूर्ण शहर परिसराचा भार आहे. आता चालू वर्षात पोलीस स्थानकात २०० गुन्हे दाखल झाले असून, पोलीसबळ अद्याप ८८ इतकेच आहे. त्यामुळे शहर पोलीस स्थानकातील पोलिसांवर कामाचा अतिरिक्त भार पडत असल्याचे चित्र दिसत आहे.सनबेपत्ताशोध२००३६३५९२००४७१६५२००५५०४७२००६६४६३२००७७३६८२००८६६५८२००९८५६३२०१०६७६०२०११४७४५२०१२४९४५२०१३९६९४२०१४५०४६२०१५६६५६