शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

उड्डाणपुलाच्या दुर्घटनेबाबत चिपळूण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

By संदीप बांद्रे | Updated: October 18, 2023 12:14 IST

सामाजिक कार्यकर्ते तानु आंबेकर यांनी गुन्हा दाखल करण्याची केली मागणी

चिपळूण : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर चौपदरीकरणा अंतर्गत शहरातील बहादूरशेखनाका येथे नव्याने उभारण्यात येत असलेला उड्डाणपुल सोमवारी (दि.१६) दुपारी २.४५ वाजता कोसळला. या घटनेच्या पार्श्वभूमीवर अॅड. ओवेस पेचकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. याप्रकरणी २३ ऑक्टोबर रोजी सुनावणी होणार आहे. त्यातच आता सामाजिक कार्यकर्ते तानु आंबेकर यांनी याबाबत थेट चिपळूण पोलीस स्थानकात तक्रार दिली आहे.या घटनेनंतर येथे जोरदार पडसाद उमटले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून अभियंत्यांना हार घालून निषेध व्यक्त केला गेला. त्यापाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून रास्तारोको केला गेला. मात्र या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन अद्याप कोणत्याही प्रकारची लेखी तक्रार कोणीही केलेली नाही. राष्ट्रीय महामार्ग विभागाने देखील अद्याप याबाबत कोणतेही पाऊल उचललेले नाही. अशातच सामाजिक कार्यकर्ते तानु आंबेकर यांनी चिपळूण पोलिस ठाण्यात या घटनेविषयी ऑनलाईन लेखी तक्रार मंगळवारी रात्री दिली आहे.  या तक्रारीत आंबेकर यांनी नमूद केले आहे की, उड्डाणपूल कोसळून मोठी वित्तहानी झाली आहे. या घटनेने मी या देशाचा नागरिक म्हणून व्यथित झालो आहे. या घटनेची गंभीरपणे दखल घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाचे 27 एप्रिल 2017चे शासन परिपत्रक क्रं.संकिर्ण 2017/प्र.क्र.9/नियोजन -3 नुसार कारवाई करावी. या परिपत्रकामध्ये डांबरी रस्त्याचे आयुर्मान 15 वर्ष, काँक्रीट रस्त्याचे 30 वर्ष आणि पुलाचे 100 वर्षापर्यंत गृहीत धरून संकल्पन करण्यात यावे. काम खराब झाल्यास किंवा पूल पडल्यास त्याची सर्व जबाबदारी कंत्राटदार व संबंधित पर्यवेशकीय अधिकारी यांची राहील. त्या संबधाची विशेष अट निविदेत नमुद करून ही कारवाई दिवाणी आणि गुन्हेगारी स्वरूपाची राहील याची नोंद संबंधितांनी घेतलेचे प्रमाण पत्र जोडून कंत्राटदारांची सही घ्यावी असे नमुद आहे.या घटनेला जबाबदार असलेल्या संबंधित ठेकेदार (नावं माहीत नाही), संबंधित मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग, अधिक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम मंडळ व कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग रत्नागिरी आणि ब्रिज डिझाईन इंजिनीयर (नांवे माहीत नाहीत) आणि यावरील सर्वोच्च लोक प्रतिनिधी व सार्वजनिक बांधकाम मंत्री जबाबदार आहेत. त्यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल होणे आवश्यक आहे. आय.पी.सी.कलम 440, कलम 120 क आणि ख फौजदारी पात्र कट, कलम 431 व 432 सार्वजनिक रस्ता पुल याची खराबी व नुकसान कारक व अडथळा निर्माण होईल अशी आगळीक करणे, कलम 166 कोणत्याही व्यक्तीला क्षती पोचविण्याच्या उद्देशाने लोकसेवकाने कायद्याची अवज्ञा करणे, कलम 268 सार्वजनिक उपद्रव, कलम 420 निकृष्ठ बांधकाम करून फसवणूक, ठकवणूक करणे व आय.पी.सी. 34 दोन पेक्षा जास्त लोकांनी मिळून कृति करणे आणि महाराष्ट्र पोलिस अधिनियम 1951 चे कलम 102 व कलम 115 खाली गुन्हे दाखल करण्यात यावेत. सी.आर.पी.सी.133 व 152 प्रमाणे कृति वा अंमलबजावणी व्हावी. असेही आंबेकर यांनी नमूद केले आहे.

उड्डाण पुलाची दुर्घटना गंभीर स्वरूपाची असताना देखील शासकीय स्तरावर दखल घेतली जात नसेल तर ते गंभीर आहे. राष्ट्रीय महामार्ग विभागानेच या विषयी पोलीस स्थानकात तक्रार द्यायला हवी होती. -  तानु आंबेकर, चिपळूण.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीChiplunचिपळुणPoliceपोलिस