शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

विभागीय स्पर्धा न झाल्याने खेळाडू गुणांना मुकले

By admin | Updated: June 13, 2016 00:09 IST

दहावी, बारावी परीक्षा : विभागीय स्पर्धेची सक्ती विद्यार्थ्यांना डोकेदुखीची

शिरगाव : भारतीय शालेय महासंघ मान्यताप्राप्त विविध क्रीडा प्रकारात राज्यस्तरीय स्पर्धा खेळलेल्या शालेय स्पर्धेतील खेळाडू वगळता संघटनात्मक अजिंक्यपद स्पर्धेतील खेळाडूंना शासनाकडून मिळणाऱ्या वाढीव गुणांपासून वंचित रहावे लागले आहे. ज्याप्रकारे शालेय स्पर्धा होतात, त्याच पदधतीने जिल्ह्यातून थेट राज्यस्पर्धा खेळण्यापूर्वी विभागीय स्पर्धा न घेतल्याने शासनाने संघटनात्मक राज्य स्पर्धेतील खेळाडूंना गुण दिले नाहीत, अशी माहिती पुढे आली आहे.दहावी, बारावीतील विद्यार्थ्यांचे स्पर्धेची तयारी करतानाच अभ्यासाकडे होणारे दुर्लक्ष, परिणामी गुणांवर होणारा परिणाम विचारात घेऊन खेळाडूंना वाढीव गुण देण्याचे धोरण राबवले गेले. गतवर्षी मान्यताप्राप्त संघटनांनी विभागीय स्पर्धा घेण्याचे परिपत्रक काढले. तथापि, महाराष्ट्र आॅलिम्पिक असोसिएशनने तांत्रिकदृष्ट्या विभागीय स्पर्धा खेळवणे शक्य नसल्याचा ठराव करुन शासनाला कळवले. खेळाडूंना ते त्रासदायक व संघटनानाही अडचणीचे ठरल्याने शासनाच्या अपेक्षेप्रमाणे स्पर्धा झाल्या नाहीत. शालेय स्पर्धेप्रमाणेच संघटनात्मक राज्य अजिंक्यपद स्पर्धेला राज्य संघटनेच्या विनंतीवरुन शासकीय निरीक्षक हजर असतात. विविध क्रीडा प्रकारांच्या राज्य स्पर्धा होताना विभागीय स्पर्धा न खेळता राज्यस्पर्धेला त्यांनी अनुमती का दिली? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. जिल्हास्तरीय कोणत्याही निवड चाचणीच्यावेळी उपस्थित क्रीडाधिकारी यांनी विद्यार्थी व पालकांना शासनाच्या वाढीव गुण धोरणाबाबत पारदर्शक माहिती का दिली नाही? तसेच मागील वर्षातील धोरणानुसार शालेय व संघटनात्मक स्पर्धेनंतर राज्यस्पर्धेचा निकाल १५ दिवसात वेबसाईटवर घोषित करावा, अशी सूचना असताना प्रत्यक्षात अंमलबजावणीपासून ती दूर राहिली. भारतीय शालेय महासंघाने साधारणपणे ५० खेळांना अधिकृत व ११० खेळांना प्रायोगिक तत्वावर मान्यता दिली आहे. विद्यार्थ्यांचा खेळाकडे ओढा वाढण्यासाठी व सक्षम युवा पिढी घडण्यासाठी खेळाकडे लक्ष हवे, ही शासनाची घोषणा हवेत विरत आहे. शालेय, महाविद्यालय स्तरावरील खेळाडूंबाबतची गोंधळाची स्थिती पाहता भविष्यात प्रतिकूल स्थितीत क्रीडा संघटना चालवणे हे संघटकांसमोर आव्हान ठरणार आहे. संघटनांना-खेळाडूंना आर्थिक पाठबळ देण्याऐवजी शासनाने विविध चार टप्प्यात स्पर्धांमध्ये वयोगटानुसार मुला-मुलींचा सहभाग घेण्याची सक्ती केल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. एकूणच विभागीय स्पर्धेची सक्ती ही खेळाडू व संघटनांसाठी डोकेदुखी ठरत आहे. राज्य पातळीवरील बहुचर्चित अशा या प्रश्नाबाबत शासनाने पालक व खेळाडूंसाठी असलेले पारदर्शक धोरण स्पष्ट करावे, अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)