शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात ३९४ ठिकाणी 'नमो उद्यान' विकसित करणार; नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी एकनाथ शिंदे यांची घोषणा
2
माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकला, ठाकरे गट आक्रमक, दादरमध्ये तणाव
3
पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील बायोपिकची घोषणा, हा अभिनेता साकारणार भूमिका, पोस्टर रिलीज
4
"२४ तासांच्या आत कळलं पाहिजे"; मीनाताईंच्या पुतळ्यावर रंग फेकल्याच्या प्रकरणावरुन राज ठाकरेंचा इशारा
5
जय शाह आणि अनुरग ठाकूर शाहिद आफ्रिदीला भेटले? जाणून घ्या 'त्या' VIDEO चे सत्य...
6
मारुती व्हिक्टोरिससाठी २ लाखांचे डाऊनपेमेंट केले तर किती बसेल EMI? बेस मॉडेलसाठी...
7
लग्नाच्या अवघ्या २०व्या दिवशी नवरी झाली फरार; नवऱ्याला म्हणाली लवकर जाऊन येते अन्...
8
पगारापेक्षा जास्त घरभाडे; SEBI ने आपल्या प्रमुखांसाठी घेतले अपार्टमेंट, मासिक भाडे तब्बल ₹७ लाख
9
एटीएममधून पैसे निघाले नाहीत, तरी अकाउंटमधून कट झाले? फक्त या स्टेप फोलो करा, बँक स्वतः देईल भरपाई
10
"आज आजोबा हयात असते, तर धर्माच्या नावाखाली जे..."; प्रबोधनकारांसोबतचा फोटो, राज ठाकरेंनी कुणाचे टोचले कान?
11
Chota Rajan: गँगस्टर छोटा राजनला सर्वोच्च न्यायालयाचा दणका, जया शेट्टी हत्या प्रकरणात जामीन रद्द!
12
५८ किलो सोने, ८ कोटी रोकड चोरीला; SBI बँकेत दरोडा, महाराष्ट्र-कर्नाटक पोलिसांकडून चोरांचा शोध
13
"अभिषेकच्या शेजारीच माझ्यावर अंत्यसंस्कार करा"; भावाच्या मृत्युनंतर बहिणीने संपवलं आयुष्य, हातावरच लिहिली शेवटची इच्छा
14
अपघाताने आयुष्य उद्ध्वस्त! स्ट्रेचरवर जखमी पत्नी अन् शेजारी पतीचा मृतदेह; डोळे पाणावणारा फोटो
15
चिंताजनक! मेंदू खाणाऱ्या अमिबाने घेतला १८ जणांचा जीव, तापासह 'ही' लक्षणं दिसताच व्हा सावध
16
PM Modi Birthday: ७५ वर्षांचे झाले नरेंद्र मोदी! ११ वर्षांच्या कार्यकाळात शेअर बाजार सुस्साट, २४०% ची वाढ, काय आहेत कारणं?
17
अदलाबदली! २ मुलांचा बाप 'मेहुणी'सोबत पळाला; भाऊ चिडला, भावोजीच्या 'बहिणी'सोबत छूमंतर
18
जखमी नवजोत सिंह आणि त्यांच्या पत्नीला २२ किलोमीटर दूर असलेल्या हॉस्पिटलमध्ये का घेऊन गेली गगनप्रीत? झाला खुलासा!
19
PM Modi Turns 75: वयाची ७५ वी अमृत महोत्सव म्हणून का साजरी केली जाते? सनातन धर्मात सापडते उत्तर 

चिपळुणात प्लास्टिक कचरामुक्त मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 12:01 IST

Chiplun No Plastic- चिपळूणमधील सह्याद्री निसर्ग मित्र, डाऊ केमिकल कंपनी आणि चिपळूण नगर परिषदेच्या सहकार्याने प्लास्टिक कचरा मुक्त चिपळूण मोहीम हाती घेण्यात आली आहे.

ठळक मुद्देचिपळुणात प्लास्टिक कचरामुक्त मोहीम सह्याद्री निसर्ग मित्र, डाऊ केमिकलचा उपक्रम

अडरे : चिपळूणमधील सह्याद्री निसर्ग मित्र, डाऊ केमिकल कंपनी आणि चिपळूण नगर परिषदेच्या सहकार्याने प्लास्टिक कचरा मुक्त चिपळूण मोहीम हाती घेण्यात आली आहे.या मोहिमेमध्ये पहिल्या टप्प्यात दुधाच्या प्लास्टिक पिशव्या जमवण्यात येणार आहेत. दूध ओतून घेतल्यानंतर या पिशव्या कचऱ्यात व पर्यायाने डम्पिंग ग्राउंडवर जाऊन पडतात. संस्थेतर्फे या पिशव्या प्रत्येक चहाचे दुकान, हॉटेल, टपरी तसेच शहरातील गृहसंकुले, वैयक्तिक घरे येथून गोळा केल्या जातील. जेणेकरून त्या कचऱ्यात पडणारच नाहीत. यासाठी संस्थेने प्राथमिक सर्वेक्षण पूर्ण केले असून, सर्व व्यावसायिक तसेच गृहप्रकल्प यांच्याजवळ चर्चा केली आहे.सह्याद्री निसर्ग मित्रतर्फे दररोज सकाळी संपूर्ण चिपळूणमध्ये फिरून या पिशव्या जमवण्यासाठीची व्यवस्था केली आहे. जमा केलेल्या प्लास्टिक पिशव्या पुनर्चक्रीकरण (रिसायकलिंग) साठी पाठवण्यात येणार आहेत. या मोहिमेमध्ये घरगुती व सोसायटी स्तरावर ओला कचरा कम्पोस्टिंग व सुका कचरा व्यवस्थापन सुरू करण्यात आले आहे. गेल्या वर्षी किरणविहार संकुल या ७० सदनिका असणाऱ्या गृहसंकुलामध्ये कचरा मुक्त सोसायटी हा प्रकल्प यशस्वी केला.सोसायटीतील ओल्या कचऱ्याचे सोसायटीतच कंपोस्ट खत बनवले व सुका कचरा वर्गीकरण करून पुनर्चक्रीकरण (रिसायकलिंग) साठी पाठवण्यात आला. प्रकल्प यशस्वी झाल्यामुळे सदनिका धारकांना नगर परिषदेकडून घरपट्टीत ५ टक्के सूट मिळाली. त्याचाच पुढचा भाग म्हणून दुधाच्या प्लास्टिक पिशव्या गोळा करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे.

वैयक्तिक, व्यावसायिक, सोसायट्या यांनी दुधाच्या रिकाम्या प्लास्टिक पिशव्या नेण्यासाठी तसेच ओला कचरा कंपोस्ट प्रकल्पात सहभागी होण्यासाठी भाऊ काटदरे, उदय पंडित यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.बायबॅककडे दुर्लक्षदुधाची रिकामी पिशवी उत्पादकाने बायबॅक करावी व पुनर्चक्रीकरणासाठी द्यावी, असा कायदा शासनाने केला आहे. दुधाच्या पिशवीवर बायबॅक किंमत ५० पैसे छापलेलीही आहे. दूध उत्पादकांनी या पिशव्या बायबॅक करून पुनर्चक्रीकरणासाठी द्याव्यात, असे अपेक्षित आहे. परंतु असे घडत नसल्याने दूध पिशव्यांचा कचरा वाढतच आहे.

टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदीGarbage Disposal Issueकचरा प्रश्नChiplun Nagar Parishadचिपळूण नगरपरिषदRatnagiriरत्नागिरी