शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

कळवंडे धरणाच्या घसरलेल्या पिचींगचे काम युध्दपातळीवर, धरणाला धोका नसल्याची कार्यकारी अभियंतांची माहिती

By शोभना कांबळे | Updated: July 27, 2023 18:55 IST

रत्नागिरी : कळवंडे लघु पाटबंधारे योजनेवरील पूर्वी घसरलेल्या भागाच्या लगत अश्मपटल (पिचींग) गुरूवार, दि. २७ जुलै रोजी सकाळी ६ ...

रत्नागिरी : कळवंडे लघु पाटबंधारे योजनेवरील पूर्वी घसरलेल्या भागाच्या लगत अश्मपटल (पिचींग) गुरूवार, दि. २७ जुलै रोजी सकाळी ६ वाजता घसरल्याचे निदर्शनास आले. संबंधित ठेकेदार व यांत्रिकीविभागाच्या यंत्रसामुग्रीसाठी तातडीने सूचना देऊन दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. सद्यस्थितीत धरणाला कोणताही धोका नाही, अशी माहिती कार्यकारी अभियंता गणेश सलगर यांनी दिली.या माती धरणाची लांबी २१० मीटर असून उंची १५.५६ मीटर आहे. धरणातील उपयुक्त पाणीसाठा १.९२८ दलघमी इतका आहे. १९८३ साली हा प्रकल्प पूर्ण झाला आहे. आजचा उपयुक्त पाणीसाठा ०.५८७ दलघमी, सद्या धरणामध्ये ३० टक्के पाणीसाठी आहे. धरण सुरक्षिततेकरिता विमोचकातून ८.६५ घमी/सेंकद. धरणाच्या अधोबाजूस नदी किनारी असणारे गावे बाैध्दवाडी, कातळवाडी, कोंडये, बाणेवाडी व नावतवाडी ही आहेत.२८ जून २०२३ रोजी उर्ध्व बाजूकडील माती भरावाकडील अश्मपटल घसरले होते. त्याची दुरुस्ती करण्यात आली आहे. गुरूवारी सकाळी ६ वाजता पूर्वी घसरलेल्या भागाच्या लगत अश्मपटल घसल्याचे निदर्शनास आले. अश्मपटल घसरलेला भाग हा पाणी पातळीच्या वरील भागातील असल्याने संबंधित ठेकेदार व यांत्रिकी विभागाच्या यंत्रसामुग्रीसाठी त्यांना तातडीने सूचना देऊन घसरलेल्या भागातील दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. सद्यस्थितीत धरणाला कोणताही धोका नाही, असेही सलगर यांनी प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीDamधरण